म. टा. वृत्तसेवा, : घरात एकटीच असल्याची संधी साधत १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर चाळमालकाने केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, चाळमालक सुनील यादव यालाही अटक करण्यात आली आहे.

बोईसरच्या धनानी नगर येथील श्रीराम नगर भागातील चाळीत राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर चाळमालक असलेल्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. तिचा भाऊदेखील खेळण्यासाठी बाहेर गेला असता २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता चाळमालक घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करू लागल्याने मुलीने आरडाओरड केला. मुलीचा आवाज ऐकून शेजारी रहात असलेल्या महिलेने तिला त्याच्या तावडीतून वाचवले. सायंकाळी मुलीचे आईवडील आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांना समजला. त्यानंतर ३० जुलै रोजी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सोमवारी सुनील यादव यास अटक करण्यात आली.

विवाहितेची आत्महत्या, पतीवर गुन्हा

दिव्यात एका महिलेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह दोघांविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झाली नसून याप्रकरणी पोलिस सखोल चौकशी करत आहेत.

दिव्यातील बीआर नगरमध्ये २९ वर्षांची महिला राहत होती. मात्र, पती आणि अन्य एक नातेवाईक तिला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव आणत होते. तसेच दिव्यातील घरही नावावर करण्याविषयी तगादा लावला होता. या महिलेला लग्न झाल्यापासून मुलही झाले नव्हते. त्यामुळे घरात तिचा मानसिक छळ केला जात असे. या त्रासाला कंटाळून तिने गेल्या महिन्यात २० तारखेला घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पतीसह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here