सोलापूर : नववीत शिक्षण घेत असलेल्या एका १६ वर्षीय शालेय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मृत मुलगी ही शालेय जीवनात अतिशय हुशार होती. आपण नववीत आहोत आपणास दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे आहे म्हणून ती अभ्यासाकडे फार आवडीने लक्ष देत होती. आई ही पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात कामास आहे तर वडील मोलमजुरी करुन संसाराचा गाडा हाकतात. अतिशय बिकट परिस्थितीत आई-वडील आपल्या मुलीला शिकवत असताना मात्र पोरीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेने पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आई वडील घरी येताच त्यांना मुलीचा मृतदेह दिसला

घराची परिस्थिती बिकट असल्याने आई-वडील दोघेही मिळेल ते काम करत होते. नेहमीप्रमाणे आई- वडील कामावरून शनिवारी दुपारी घरी आले. मात्र, रोज अभ्यास करताना दिसत असलेली मुलगी एकदम घराच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसून आली. ही हृदयद्रावक घटना पंढरपुरातील अनिलनगर येथे घडली. रूपालीने अज्ञात कारणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतला आहे. तिला उपचारासाठी पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

उर्दू बॅनर्सवरुन वाद शिगेला, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांचे बॅनर्स पोस्ट करत पलटवार

भेटण्यासाठी मैत्रिणी घरी आल्या होत्या

रोजच्या प्रमाणे सदर मृत मुलगी आपल्या घरी अभ्यास करत होती. शनिवारी सकाळी तिला भेटण्यासाठी मैत्रिणी घरी आल्या होत्या. या मैत्रिणींसोबत एक मित्र देखील होता. मित्र मैत्रिणीमध्ये काय संवाद झाला याचे गूढ कायम आहे. कारण मित्र मैत्रिणी परत गेल्यानंतर तिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला. घरी येऊन गेलेल्या मित्र मैत्रिणींची विचारपूस झाली असता मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असा अंदाज पंढरपूर शहरात व्यक्त केला जात आहे. या मृत्यूची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

सीएसएमटी-कल्याण या धावत्या लोकलमध्ये घडली थरारक घटना, दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here