वाशिम : लेकाचं बाइक घेण्याचं स्वप्न होतं. पण बापाची परिस्थिती हलाकीची होती. मग काय बापाने स्वतःच लेकासाठी ई-बाइक बनवली अन् तिही भंगारातून आणलेल्या साहित्यापासून. आता लेक मोठ्या दिमाखात आपल्या मित्रांना टशन दाखवत या बाइकवरून कॉलेज गाठतोय. ही स्टोरी आहे वाशीमच्या कारंजा शहरात राहणाऱ्या रहीम खान आणि शाफिन खान या पितापुत्राची. शाफिन हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. पण त्याचे मित्र मात्र मोटारसायकलने कॉलेजला यायच. हीच बाब त्याच्या मनाला रुतली अन् त्याने आपल्या वडिलांकडे बाइक घेऊन देण्याची मागणी केली. पण इलेक्ट्रिशियनचं काम अन् घरी छोटसं वेफर्सचं दुकान चालवून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहीम यांच्याकडे लेकाला बाइक घेऊन देण्याएव्हडे पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतःच लेकाला बाइक बनवून देण्याचा निश्चय केला आणि भंगाराचं दुकान गाठलं. तिथून त्यांनी बाइकसाठी लागणारे हँडल, शॉकअब्स, टायर इत्यादी साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केलं. नंतर एक २४ होल्टची बॅटरी अन् २४ होल्टची मोटार घेतली. आणि घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडीवर फिट केली. स्वतः इलेक्ट्रिशियन असल्याने व्यवस्थित सर्किट जोडून भंगार साहित्यापासून एक ई-बाइक तयार केली.

अख्खं गाव साखर झोपेत होतं अन् अनर्थ घडला, ईद पूर्वीच शेतकऱ्याचं स्वप्न झालं बेचिराख
शिवाय तिला चांगला लूक देण्यासाठी स्पीडमीटर, हेडलाइट, साइड इंडिकेटर जोडून कलरिंगही केली. याच जुगाड बाइकवरून आता शाफिन कॉलेजला जातो. शाफिनची ही बाइक इतकी आकर्षक आहे की लाखो रुपयांच्या गाड्या असलेल्या त्याच्या मित्रांनाही या गाडीची राइड घेण्याचा मोह आवरत नाही.

पोटासाठी जीव गमावला लागला; समृद्धीवर चहा विकायला गेला अन् अपघात झाला, अपघातांचा रनवे

ही बाईक बनविण्यासाठी रहीम खान यांना साधारण २० हजार रुपये खर्च आला अन् दोन महिन्यांचा कालावधी लागला. ही बाइक ५० ते ६० किलो वजन घेऊन २० ते २५ किमी प्रतितास वेगाने धावते. या बाइकला अधिक क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली तर हिची क्षमता आणि वेगही वाढवता येईल, अशी माहिती रहीम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here