त्या मुलाच्या चित्राचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल कौतुक
पुणे शहरात होणार्या नदी सुधार प्रकल्पाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून त्या कामादरम्यान हजारो झाडांची कत्तल होणार आहे. त्यावर पुणे शहरातील पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. झाडांची कत्तल होता कामा नये अशी भूमिका मांडली गेली आहे. कात्रज येथील कार्यक्रमा करिता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आले होते. त्यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी हाच मुद्दा मांडला. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, याबाबत सर्व माहिती मला पाठवून द्या. संबधीत व्यक्ती सोबत बोलून घेतो.
…आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला
त्याच वेळी सिद्धांत शेळके या मुलाने एक झाड आणि त्याला झोपाळा असल्याच चित्र राज ठाकरे यांना दाखविले. राज ठाकरे ते चित्र बघतच राहिले. अरे वा, अस म्हणत त्या मुलाचे कौतुक केले. अरे त्या झोपळयावर कोणाला तरी बसव असं राज ठाकरे यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
युनिव्हर्सिल अँनिमल वेलफेअर सोसायटीतर्फे डॉग पाँड उभारण्यात आला आहे. यामध्ये २५० ते ३०० श्वानांची क्षमता आहे. पुणे शहरात वाढत चाललेला भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे. अशा कुत्र्यांची प्रजनन क्षमता काढून घेऊन त्यांना परत सोडण्याच काम हे युनिव्हर्सल करत. युनिव्हर्सिल अँनिमल वेलफेअर सोसायटी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे ज्यांना ABC आणि AR चं सर्टिफिकेट आहे आणि पुण्यात उभारलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही संस्थेने एवढं मोठं काम केलं नाही.