नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव शहरात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूतील बॅनर जोरात चर्चेत आलेले असताना दुसरीकडे मालेगावात ठाकरे गटाने लावलेला एक बॅनर अधिक चर्चेत आला आहे. या बॅनर वर जसं मला सांभाळलं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य, त्यांचा आणि प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे.

मालेगावात होणारी सभा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा असा आशयाचा सभेचा बॅनर अधिक चर्चेत आला आहे. मालेगाव शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभेपासून साधारणपणे अर्धा
किलोमीटर अंतराच्या महात्मा फुले चौकात हा बॅनर लावण्यात आलेला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत केलेल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले होते. जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तशा पद्धतीने मालेगावात लावलेल्या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने आवाहन केले आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो या बॅनर वर आहेत.

केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेताना CBIकडून अटक; कोर्टात नेतेवेळी भलतंच घडलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे राज्यभरात ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचे काम चालू आहे. नाशिकच्या मालेगावात प्रथमच उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना भावनिक आव्हान करण्यात येत आहे.

उर्दू बॅनर्सवरुन वाद शिगेला, ठाकरे गटाचं प्रत्युत्तर, एकनाथ शिंदेंसह भाजप नेत्यांचे बॅनर्स पोस्ट करत पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी मालेगावात बॅनरबाजी मोठा प्रमाणात करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांच्या मालेगावचे स्वागत असे देखील बॅनर लागले आहेत आणि त्यातीलच उर्दू भाषेत असलेला बॅनर आणि त्यानंतर आता हा बॅनर अधिक चर्चेत आला आहे.

सूरत कोर्टानं शिक्षा सुनावली, खासदारकी गेली, राहुल गांधींकडून ट्विटरच्या बायोमध्ये बदल, भाजपला डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here