नाशिक: नाशिकजिल्ह्यातील मालेगाव शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे उर्दूतील बॅनर जोरात चर्चेत आलेले असताना दुसरीकडे मालेगावात ठाकरे गटाने लावलेला एक बॅनर अधिक चर्चेत आला आहे. या बॅनरवर ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, असा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान मालेगावात होणारी सभा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा, ‘जसं मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवल व आदित्यला सांभाळा’, असा आशयाचा बॅनर लावल्याने हा सभेचा बॅनर अधिक चर्चेत आला आहे. मालेगाव शहरात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभेपासून साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात हा बॅनर लावण्यात आलेला आहे.

साहेबांनी शब्द पाळला; लाडक्या वसंतसाठी राज ठाकरे पुण्यात, अखेर पूर्ण केली इच्छा
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत केलेल्या भाषणात शिवसैनिकांना आवाहन केले होते. ‘जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धवला व आदित्यला सांभाळा’, हे बाळासाहेबांचे शब्द मालेगावात लावलेल्या बॅनरवर झळकत आहेत. या माध्यमातून ठाकरे गटाने भावनिक आवाहन केले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे .

या बॅनरवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत.

निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म
दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले असून त्यांचे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे नाशिकच्या ओझर विमानतळावरून आपल्या वाहनांनी मालेगावच्या दिशेने निघाले आहेत मालेगावात सायंकाळी सभा होणार असून सभेकडे उद्धव ठाकरे नाशिकहून रवाना झाले आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची प्रथमच सभा मालेगाव मध्ये होत आहे त्यामुळे या सभेसाठी नाशिक व मालेगाव मधूनच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक येणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here