पुण्यात एका रिक्षा चालकानं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यामागचंं कारण अखेर समोर आलं आहे. या प्रकरणी रिक्षा चालकाच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

pune suicide
पुणे: धानोरी परिसरात दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने खदानात उडी मारल्याची घटना घडली होती. त्याचे कारण आता समोर आले आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय टिंगरे याला मारहाण केली होती. गावात आपल्याला महिलांनी मारहाण केली. त्यामुळे आपला अपमान झाला असल्याने टिंगरे यांनी खदानात उडी मारून आत्महत्या केली. टिंगेरे हे पेशाने रिक्षा चालक असल्याची माहिती समोर आली आहे.अजय शिवाजी टिंगरे (वय ४२, रा. धानोरी गाव) यांच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अजय टिंगरे हा रिक्षा चालवण्याचे काम करायचा. २३ मार्चच्या रात्री अजय दारू पिऊन घरी आला. दारूच्या नशेत तो घरासमोर उभे राहून शिवीगाळ करू लागला. त्याच्या बायकोने त्याला समजावून सांगितले. त्यानंतर अजय घरात जाऊन झोपला. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले. तो झोपेत असतानाचा त्याला मारत घराबाहेर आणले. अजयच्या बायकोने त्यांना मारू नका अशी विनवणी केली. मात्र ते त्याला मारत राहिले. लोक जमायला लागल्यावर ते निघून गेले.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?


त्यानंतर अजय टिंगरे हा गाडी घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग मुलगीदेखील घराबाहेर पडली. गावातील महिलांनी आपल्या घरात शिरून आपल्याला मारहाण केली, आपला अपमान केला, असे अजयला वाटत होते. मारहाणीचा राग त्याच्या मनात होता. याच रागाच्या भरात त्याने विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील खदानात उडी मारली आणि आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here