grant road stabbing: चाकू हल्ला करून तीन शेजाऱ्यांना संपवणाऱ्या चेतन गालाला पोलिसांनी अटक केली आहे. चेतननं केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

grand road stabbing
मुंबई: दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडमध्ये शुक्रवारी रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. पार्वती मॅन्शनमध्ये वास्तव्यास असलेल्या चेतन गाला (५४) नावाच्या व्यक्तीनं आपल्या शेजाऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चेतननं रागाच्या भरात हा हल्ला केल्याची माहिती सुरुवातीला पुढे आली होती. मात्र त्यानं हा हल्ला अतिशय थंड डोक्यानं केल्याचं तपासातून उघड झालं आहे. चेतन गालानं शेजाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी चाकूचा वापर केला. त्यानं काही दिवसांपूर्वीच एक धारदार चाकू आणला होता, असं वृत्त फ्री प्रेस जर्नलनं पोलीस दलातील सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. चेतनकडे असलेला चाकू त्याच्या कुटुंबातील सदस्यानं पाहिला. त्यानं या चाकूवर आक्षेप घेतला. चाकू फेकून द्या, असं चेतनला सांगण्यात आलं. त्यानंतर चेतननं चाकू फेकूनही दिला.
यातूनही वाचलास तर फास लाव! प्रियकराला विष देऊन प्रेयसीचा कॉल; तो अखेरच्या घटका मोजत राहिला
चेतननं पुढच्या काही दिवसांत नवा चाकू खरेदी केला. याच चाकूनं त्यानं शेजाऱ्यांवर हल्ला चढवला. शुक्रवारी (२४ मार्च) ही घटना घडली. या प्रकरणी डीबी मार्ग पोलिसांनी चेतनला अटक केली आहे. चेतन गाला याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जवळपास २० मिनिटं चेतननं शेजाऱ्यांवर चाकू घेऊन तुटून पडला. यानंतर काही जणांनी बॅट, काठ्या घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन घरात जाऊन लपला. या दरम्यान पोलीस इमारतीत पोहोचले. त्यांनी चेतनशी संवाद साधला. त्यानंतर चेतन बाहेर आला.
७ रुम, १२ बेड्स, १६ बाटल्या, ‘ती’ पाकिटं; प्रसिद्ध शाळेवर अचानक धाड; आत नेमकं काय चालायचं?
चेतनची पत्नी अरुणा त्याची मुलं वेगळी राहत होती. चेतन गेल्या दीड महिन्यांपासून त्यांना माघारी बोलावण्याचे प्रयत्न करत होते. शुक्रवारी दुपारी अरुणा नेहमीप्रमाणे चेतनला जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्यासोबत लेकही होते. यावेळी चेतन आणि अरुणाचा वाद झाला. चेतन चाकू घेऊन लेकीच्या अंगावर धावला. अरुणानं त्याला ढकललं आणि ती लेकीसह तिथून पळून गेली.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

अरुणा आणि लेकीला संपवण्यासाठी चेतन चाकू घेऊन घराबाहेर आला. शेजाऱ्यांनी भडकवल्यामुळेच अरुणा आपल्याला सोडून गेल्याचा राग त्याच्या मनात होता. अरुणाला शोधण्यासाठी तो शेजारी राहणाऱ्या मेस्त्रींच्या घरात गेला. त्यानं इलाबेन मेस्त्री (७०) आणि जयेंद्रभाई मेस्त्री (७७) यांना चाकूनं भोसकलं. मेस्त्री दाम्पत्याचा आवाज ऐकून पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या स्नेहल ब्रह्मभट (४४) आणि त्यांची कन्या जेनिल (१८) दुसऱ्या मजल्यावर आल्या. चेतननं त्यांच्यावरही सपासप वार केले. त्यात जेनिलचा मृत्यू झाला. तर स्नेहल जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here