जोधपूर: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. आता अभिनेत्याला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी सलमानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या इमेलनंतर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान आता या प्रकरणाचे कनेक्शन आता राजस्थानमधील जोधपूरशी असल्याचे समोर आले आहे. सलमानला देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी जोधपूर पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. पोलिसांच्या संयुक्त पथकाने जोधपूरमधील रोहिचा कला या गावात राहणाऱ्या धाकडराम याला ताब्यात घेतले आहे. जोधपूर पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.शेवटच्या रात्री कुठे गेली होती आकांक्षा दुबे? मेकअप आर्टिस्टने सांगितलं त्या पार्टीविषयी…
मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी मिळून केली कामगिरी

याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना अशी माहिती मिळाली होती की, जोधपूरमधील रहिवासी २१ वर्षीय धाकडराम याने अभिनेता सलमान खानला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज पाठवले होते. मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जोधपूरच्या लुणी पोलिसांना कळवण्यात आले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. यानंतर मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बजरंग जगताप यांनी त्यांच्या पथकासह लुणी पोलीस ठाणे गाठले आणि यानंतर दोन्ही पथकांनी मिळून आरोपींना अटक केली.

मुसेवाला यांच्या वडिलांनाही आरोपींनी धमकावले

याच आरोपीने दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनाही इमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा तपास केला असता असे आढळून आले की, त्याच्यावर २०२२ साली सरदारपुरा येथे शस्त्रास्त्र कायद्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बायको आधीच विवाहित तर भावाने लुबाडलं! नवाजचे गंभीर आरोप, दाखल केला १०० कोटींचा मानहानीचा खटला
लॉरेन्सशी आहे कनेक्शन?

२२ वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला जोधपूरमध्ये न्यायालयात हजर करत असताना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सलमानच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरणही समोर आले. आता पुन्हा एकदा सलमानला आरोपी धाकडरामने धमकी दिल्याने त्याचे लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचा अंदाज बांधला जात आहे. पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here