Galaxy S सीरीजच्या नव्या स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दक्षिण कोरियाच्या कंपनीने येणाऱ्या S सीरीजची लाँच डेट आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर कन्फर्म केली आहे. कंपनीने १५ सेकंदांचा एक टीझर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात ११ फेब्रुवारी रोजी सनफ्रॅन्सिस्कोमध्ये गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेंटचं आयोजन केलं जाईल. हा लाँच इव्हेंट सॅमसंगची अधिकृत वेबसाइटवर लाइव्हदेखील पाहता येणार आहे.
या व्हिडिओत कॅमेऱ्याचा आकार दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यात Galaxy या शब्दात येणाऱ्या दोन a च्या जागी चौकोनी आणि आयाताकृती आकाराचे बॉक्स दाखवले आहेत. या आकारांच्या बाबतीत असं म्हटलं जात आहे की गॅलॅक्सी एस ११ (किंवा S20) आणि मोटो रेजर २०१९ पासून प्रेरित गॅलॅक्सी फोल्ड २ च्या कॅमेऱ्या बम्पकडे इशारा करणारे हे आकार आहेत. इतकंच नाही तर अशी आशा केली जात आहे की कंपनी ११ फेब्रुवारीच्या इव्हेंटमध्ये Apple Airpods Pro ला टक्कर देणारा नवा फोन आणू शकते.
गॅलॅक्सी फोल्ड २ देखील होणार लाँच
सॅमसंगये तीन नवे स्मार्टफोन्स येणार असल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. यात दोन फोन गॅलॅक्सी एस सीरीजचे आहेत आणि एक क्लॅमशेल डिझाइनचा गॅलॅक्सी फोल्ड २ आहे, अशी माहिती होती. असंही म्हटलं जात आहे की २०२० चे नवे गॅलॅक्सी स्मार्टफोन S20e, S20 आणि S20 Plus नावाने येणार आहेत.
गॅलॅक्सी नोट १० सीरीजसारखा पंच होल डिस्प्ले
सॅमसंगच्या आगामी गॅलॅक्सी एस २० मध्ये गॅलॅक्सी नोट १० सीरीजसारखा पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर अन्य काही रिपोर्ट्स म्हणतात की नव्या गॅलॅक्सी एस सीरीजच्या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ किंवा Exynos 990 प्रोसेसर असणार आहे. गॅलॅक्सी फोल्ड २ मध्ये सध्याच्या गॅलॅक्सी फोल्डवाला हिंज मेकॅनिझम दिलं जाईल. या फोनमध्ये अल्ट्रा थिन ग्लास कव्हर दिलं जाईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times