भोपाळ : दोन महिन्यांची चिमुकली बाथरुममधील बादलीत मृतावस्थेत आढळल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला. आपल्या धाकट्या बहिणीला टेडी बेअरप्रमाणे आंघोळ घालण्याचा दोन चिमुरड्यांचा अट्टाहास बाळाच्या जीववार बेतल्याचं समोर आलं. मृत चिमुकलीला तिच्या चार आणि सहा वर्षांच्या बहिणी आंघोळ घालत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. मध्य प्रदेशात ही काळजाला घरं पाडणारी घटना घडली आहे. ही घटना २२ मार्च रोजी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील शोभापूर गावात घडली. अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. बादलीत अर्भकाचा मृत्यू कसा झाला किंवा त्यावर झाकण का होते, याचा पोलिसांनाही पत्ता नव्हता. त्यांनी आधी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

सुरुवातीला मृत बालिकेच्या पालकांवर आणि घराजवळून जाणाऱ्या भिकाऱ्यावर गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय होता. तीन दिवसांनंतर त्यांचे लक्ष चार आणि सहा वर्षांच्या दोन बहिणींकडे गेले आणि या दुर्घटनेमागील सत्य समोर आले. मुली इतक्या कोवळ्या आणि निरागस वयातील आहेत, की आपण काय चूक केली याची त्यांना कल्पनाही नव्हती.

दोघी बहिणींनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांची आई स्वयंपाकघरात जेवण तयार करत असताना त्या त्यांच्या टेडी बेअरशी खेळत होत्या. त्यांचं खेळून झाल्यानंतर आई रुखसारने टेडी बेअरला आंघोळ घातली आणि वाळण्यासाठी त्याला बाहेर लटकवले. हे पाहून मोठ्या बहिणींना आपली दोन महिन्यांची बहीण अनरजा हिलाही अशाच प्रकारे बादलीत आंघोळ घालण्याची कल्पना सुचली. आईने जसे त्यांच्या टेडी बेअरसोबत केले, तेच दोघींनी बाळासोबत करायचे ठरवले.

दोघींनी अनरजाला तिच्या पलंगावरून उचलून बाथरूममध्ये आणले. आधी त्यांनी बाळाला बादलीच्या काठावर आंघोळ घालायला सुरुवात केली. मात्र दुर्दैवाने अनरजा घसरली आणि बादलीत पडली. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही दोन्ही मुली तिला पाण्यातून बाहेर काढू शकल्या नाहीत. घाबरून त्यांनी बादलीचे झाकण लावून घेतले आणि त्या बाथरूममधून बाहेर पडल्या.

VIDEO | आरडाओरड ऐकून गेली न् जीवाला मुकली, ग्रँट रोडमधील हल्ल्यात मयत तरुणीवर भावपूर्ण अंत्यसंस्कार
नंतर रुखसारने आपल्या पतीला फोन करुन अनरजा बेपत्ता असल्याचं सांगितलं. दारात आलेल्या भिकारी महिलेने तिला नेले असावे असा संशय घेऊन त्यांनी तिचा शोध घेतला. तोपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांनी घराची झडती घेतली, तेव्हा त्यांना बादलीत अनरजाचा मृतदेह सापडला.

सुदैवानं जीव वाचला

बहिणींमुळेच अनरजाचा अपघाती मृत्यू झाला, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. परंतु त्यांच्या लहान वयामुळे त्यांची कृती गुन्हा मानली जाऊ शकत नाही. कारण आयपीसीच्या कलम ८२ नुसार सात वर्षांखालील मुलाने केलेला गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here