मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. कांदिवलीत तर पश्चिम द्रुतगती मार्गावर एका कार समोर डोंगराचा भाग कोसळला आणि विजेचा खांबही कोसळला. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली. दरड कोसळल्यानंतर प्रचंड धुरळा झाल्याने घाबरलेल्या दुचाकीस्वारांनी गाड्या तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. तसेच प्रचंड प्रमाणात मातीचा ढिगारा आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील मीरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडकडे जाणारा मार्ग सुरू आहे. दरम्यान, एक मार्गिका बंद असल्याने मुंबईकडे येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा भाग कोसळल्याचं माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मातीचा ढिगारा आणि उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करण्यास सुरुवात केली आहे. दोन ते तीन तासात हे काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नालासोपाऱ्यात एसटी बंद
वसई, विरार आणि नालसोपाऱ्यातही मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. नालासोपाऱ्यात ठिकठिकाणी पाणी साचून रस्ते जलमय झाल्याने एसटी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नालासोपारा स्टेशन रोड, अचोळे रोड परिसर जलमय झाला असून या मार्गावर वाहने बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
दहिसर नदी धोक्याच्या पातळीवर
मुसळधार पावसामुळे दहिसर येथील दौलत नगरमधून वाहणाऱ्या दहिसर नदीला पूर आला आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या रहिवाश्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, येत्या ४८ तासात मुंबईसह ठाण्यात
होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने रेड अॅलर्ट जारी केला असून नागरिकांना कारण नसताना घराच्याबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच
महापालिकेने मुंबईकरांना घरातच राहण्याचे आवाहन केलं आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालये, अस्थापना बंद ठेवण्याच्या सूचनाही महापालिकेने केल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.