दरभंगा: जिल्ह्यातील आझम नगर परिसरातील एका घरात एका महिलेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. महिलेला बघितल्यानंतर लोकांनी तिला खाली उतरवलं मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.पोलीसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अमरिका देवी असं मृत महिलेचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वीच अमरिका देवीचा राजा साह याच्याशी प्रेमविवाह झाला होता. राजा हा मजूरीचे काम करून आपला संसार चालवत होता. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता. त्यांचा संसार सुखात सुरु होता. दरम्यान, राजा कामासाठी मुझफ्फरपूरला गेला. पत्नी सतत फोन करून त्याला दरभंगा येथे बोलवत होती. मात्र, याच दरम्यान तिचा मृतदेह तिच्याच घरात फासावर लटकलेला आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सकाळी ऑफिसला गेला, काहीच वेळात घरमालकाचा फोन, तुझ्या पत्नीने… पती घरी येऊन पाहतो तर…
महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली आहे, असा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे. मृत महिलेचे सासरचे लोक याला आत्महत्या म्हणत आहेत. प्राथमिक तपासानुसार, महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलीसही त्याला आत्महत्या मानत आहे. मात्र, महिलेने स्वतः आत्महत्या केली की कोणीतरी तिचा खून केला पोलीस सर्व बाजूने याचा तपास करत आहेत.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

मृत महिलेची सासू मरिना देवी यांनी सांगितले की, ती काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा त्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबात कुठलाही वाद नव्हता. पण, मृत महिला पतीला फोन करून दरभंगा येथे येण्याचे बोलत होती. तिचा नवरा राजा हा मुझफ्फरपूरला राहतो आणि मजूर म्हणून काम करतो. त्याने तिला फोन करून लवकर येण्याचे आश्वासनही दिले होते.

माणसांपासून पृथ्वी हिसकावून घ्यायला एलियन्स येताहेत! २६७१ मधून आलेल्या व्यक्तीचा दावा….
दरभंगाचे एसडीपीओ अमित कुमार यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह घराच्या आत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. महिलेने गळफास लावला की कोणीतरी तिची हत्या केली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, मृत महिलेच्या वडिलांनी तिच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. पोलीस मृताच्या वडिलांच्या तक्रारीची वाट पाहत आहेत. यानंतर तपासाला गती येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here