मध्य प्रदेशः नवऱ्यासोबत भांडण झाले, बायको चार मुलांना घेऊन घराबाहेर पडली. विहिरीत आत्महत्याकरण्यासाठी उडी घेतली. मात्र, नेमका विचार बदलला आणि महिला जगण्यासाठी धडपड करु लागली. ही भयानक घटना मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.घरगुती कलहानंतर ३० वर्षांची महिला तिच्या चार मुलांसह घराबाहेर पडली. त्यानंतर तिने चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले व स्वतःही उडी घेतली. मात्र, त्यानंतर तिला भीती वाटली व ती विहिरीत बाहेर पडण्यासाठी धडपडत होती. त्याचवेळी तिने तिच्या मोठ्या मुलीचा हात पकडून विहिरीला लटकणाऱ्या रश्शीला पकडून विहिरीबाहेर आली. मात्र, या सगळ्यात तिच्या तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात १८ महिन्यांचा मुलगा, ३ वर्षांची आणि ५ वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपुरयेथील बालदी गावात झाली आहे. महिलेचे नाव प्रमिला भिलाला असं आहे. प्रमिलाचं पती रमेशसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर तिने हे भयंकर पाऊल उचललं होतं. दरम्यान प्रमिला आणि तिची सात वर्षांची मुलगी यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रेल्वेचा ‘तो’ कर्मचारी २२ वर्षांनंतर सेवेत पुन्हा रुजू होणार, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन केले होते बडतर्फ
पोलिसांनी विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, महिलेच्या कुटुंबाचीही चौकशी करण्यात येत आहे. मात्र, प्रमिला आणि तिच्या पतीमध्ये कोणत्या गोष्टीवरुन वाद सुरु होते. हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये. या प्रकरणीही पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

देशातील सर्वात उंच रेल्वे पुलावरुन धावणार ‘वंदे भारत’; अशी आहेत चिनाब पुलाची वैशिष्ट्ये
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील नेपानगर येथील एकाच परिवारातील पाच लोकांनी आत्महत्या केली होती. घरामध्येच पती-पत्नीसह ३ अल्पवयीन मुलींचा मृतदेह सापडला होता. पतीने पत्नी आणि मुलांची हत्या करुन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली होती. या सामूहिक आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here