Civil Services Examinations 2019 Result: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेब्रुवारी आणि ऑगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यशस्वी उमेदवारांची यादीदेखील केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.

पुढील केंद्रीय सेवांमधील जागांसाठी या परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यात येईल –

१) भारतीय प्रशासकीय सेवा
२) भारतीय परराष्ट्र सेवा
३) भारतीय पोलीस सेवा
४) केंद्रीय सेवांमधील गट ‘अ’ आणि गट ‘ब’

प्रदीप सिंह या उमेदवाराने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत (मेन्स) २०१९ प्रथम क्रमांक पटकावला आहे तर जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

उमेदवारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे

नियुक्ती मिळणार असलेल्या उमेदवारांचा प्रवर्गनिहाय तपशील पुढीलप्रमाणे-
सर्वसाधारण गट – ३०४
आर्थिक वंचित गट – ७८
इतर मागासवर्गीय – २५१
एससी – १२९
एसटी ६७

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here