रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला नाही. याबाबत नॅशनल हायवे अथोरिटीकडून हा घाट बंद करण्याची मागणी करणारे पत्र जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होते. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करण्याची आवश्यकता असल्याने हा घाट बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे अशी मागणी करण्यात आली असून अद्याप घाट बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंताकडून २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत परशुराम घाट बंद करावा अशा स्वरूपाची मागणी करणारे पत्र मात्र रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला देण्यात आल होते. या मार्गाची व घाटाची पाहणी केल्यानंतर घाट बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आरटीओ चिपळूण महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. यानंतर या परशुराम गटाची पाहणी करून हा घाट बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…
येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवर काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ऍथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे या परिसराची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून ७ दिवस हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल.

परशुराम घाटात १.२० किमी लांबीत उंच डोंगररांगा, खोलदऱ्या असल्या कारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे.

भर रस्त्यात अडवलं, तलवार, लोखंडी रॉड अन् दांडक्याने बेदम मारलं; वादाचं कारण वाचून पोलीसही हादरले…
सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्यात यावी तसे आदेश देण्यात आले असून पेण, रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे १७ मार्च रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कालचा परळीतला अपघात नव्हता घातपात होता; तपासात भावजय दीराचं भलतंच प्रकरण समोर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here