भुवनेश्वर : ओयो हॉटेलच्या खोलीत एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओडिशातील खंडगिरी भागात रविवारी हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. दुर्गा प्रसाद मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कटक जिल्ह्यातील नियाली येथील रहिवासी आहे. मात्र आपल्या मुलाची पूर्वनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली, असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.भुवनेश्वर डीसीपींच्या माहितीनुसार, दुर्गा प्रसाद हा तरुण वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी ओडिशातील जगमारा भागात राहणाऱ्या त्याच्या मित्र-मैत्रिणीसह ओयो हॉटेलमध्ये गेला होता. तिथे त्यांनी केक कापून वाढदिवसाचा जल्लोष केला. त्यानंतर मैत्रीण वॉशरूममध्ये असताना त्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. मैत्रिणीच्या ओढणीच्या सहाय्याने त्याने गळफास लावून घेतल्याचा आरोप आहे.

सकाळी त्याचा मित्रांनी शोध घेतला, तेव्हा त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, असा दावा केला जात आहे. मित्रांकडून या घटनेची माहिती मिळताच खंडागिरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. दुर्गा प्रसादच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मित्रांची चौकशी सुरु केली आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दुर्गा, त्याची प्रेयसी आणि दोन मित्रांनी वाढदिवसाच्या पार्टीसाठी ओयो हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. परंतु दुर्गाच्या मित्रांनी त्याला वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून पूर्वनियोजित पद्धतीने त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांना आहे.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ
“त्याच्या एका मित्राने सांगितले की दुर्गाने त्याला बिअर न दिल्याने त्याला राग आला आणि तो दुसऱ्या खोलीत गेला. तर आणखी एका व्यक्तीने सांगितले की तो बाथरूममध्ये गेला होता आणि तेव्हा तो गळफास घेलेल्या अवस्थेत आढळला.” असं दुर्गाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

या प्रकरणी अधिक जबाब घेण्यासाठी पोलिसांनी मयत दुर्गा प्रसादचा मोबाईल जप्त केला आहे. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी खुनाचा आरोप केला असल्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

VIDEO | आरडाओरड ऐकून गेली न् जीवाला मुकली, ग्रँट रोडमधील हल्ल्यात मयत तरुणीवर भावपूर्ण अंत्यसंस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here