केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेणार आहे. हा गॅस वाहनांमध्ये वापरण्यासाठी सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पाईप गॅसमध्ये (पीएनजी) बदलला जातो. याशिवाय गॅसचा वापर वीज आणि खत निर्मितीमध्येही होतो. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित होणार्या नैसर्गिक वायूच्या किमती मर्यादित करण्याबाबत विचार करू शकते. सीएनजीपासून खत कंपन्यांपर्यंतचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने सरकार मोठं पाऊल उचलू शकते, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
सीएनजी-पीएनजीचा भाव वाढणार?
देशांतर्गत उत्पादित गॅससाठी पैसे भरण्यासाठी दोन सूत्रे आहेत. एक म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) आणि ऑइल इंडिया लिमिटेड या सारख्या राष्ट्रीय पेट्रोलियम कंपन्यांच्या जुन्या फील्डमधून उत्पादित केलेल्या गॅसचे पेमेंट फॉर्म्युला आणि दुसरे म्हणजे नवीन खोल-समुद्री क्षेत्रांमधून उत्पादित गॅसचे पेमेंट फॉर्म्युला.
रशियाने शेजारच्या युक्रेन देशावर हल्ला केल्यापासून जागतिक ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्याने स्थानिक पातळीवर उत्पादित वायूचा भावही विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.
राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गॅसच्या किमती किती वाढणार?
सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार जुन्या फील्डमधील गॅसच्या किमती $१०.७ प्रति एमएमबीटीयूपर्यंत वाढू शकतात, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले. तर अवघड क्षेत्राच्या गॅसच्या किमतीत किरकोळ बदल संभव आहे. दरम्यान, गॅसच्या किमतीतील शेवटच्या सुधारणानंतर सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ७०% पर्यंत वाढल्या असून १ एप्रिलपासून दर सुधारित केल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होईल तसेच यामुळे ऑटो रिक्षा, टेम्पोचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.