येथील शासकीय घाटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली. सोमवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. अवघ्या २८ वर्षांच्या या डॉक्टरचं नाव डॉ. शेषाद्री गौडा असं आहे.
इंजेक्शनद्वारे शरीरात विषारी रसायन घेत गौडा यांनी आत्महत्या केली. गौडा हे बेगमपुरा येथील राहणारे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र गौडा यांची सुसाइड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. मनोविकारातून हा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यात आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमधील चारकोप परिसरात ४० वर्षीय महिलेनं नोकरी गेल्यानं आलेल्या नैराश्येतून गुरुवारी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याआधी २२ वर्षीय तरुणीनं ठाण्यातील स्कायवॉकवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
मानसिक तणाव हे या आत्महत्यांच्या घटनांमागील प्रमुख कारण असल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालात स्पष्ट झालं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबईमधील आत्महत्यांच्या घटनांमध्ये ७.४ टक्क्यांची वाढ झालेली आहे. भारतात १५ ते २९ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times