शिल्पा नरवडे, नवी मुंबई : २०२४ मध्ये स्वराज्य संघटना राजकारणात येणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. नवी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी कोपरखैरणेपर्यंत भव्य दिव्य रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी संभाजीराजेंनी उपस्थितांशी संवाद साधला. साडेतीनशे वर्षांनंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजावर तितकेच प्रेम करतात. मी राजकीय नाही, राजकीय गुण माझ्यात नाहीत, नशिबाने मला फसवलं, म्हणून माझ्यात चीड निर्माण झाली. शिवरायांसारखे स्वराज्य निर्माण करण्याचे प्रयत्न तर करू. महाराष्ट्राची ओळख एकच, काय चाललेय महाराष्ट्रामध्ये, नीतीमत्ता गुंडाळून टाकलेय. लोक हुशार झालीत, लोक कंटाळलीत, असं संभाजीराजे म्हणाले.

तुम्ही दैनंदिन प्रश्नांसाठी काय करणार ते सांगा. येत्या २०२४ ला स्वराज्य राजकारणात येणार असल्याची मोठी घोषणा संभाजीराजेंनी केली. जसे अमेरिकेत व्हाईट हाऊस तसे इथे पण व्हाईट हाऊस आहे. आम्ही सांगू तो आमदार, नगरसेवक. आम्हालाही हुकूमशाही चालत नाही, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली.

व्हाईट हाऊस अमेरिकेत, दुसरं इथे आणायची गरज नाही. पांढरं रंगवलं म्हणून व्हाईट हाऊस होत नाही. लोक ठरवतील तेव्हा ते महत्त्वाचं. इथे सर्व राज्याचे भवन मात्र शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन का नाही. असा प्रश्न यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला.

नवी मुंबई एअरपोर्टवर जास्तीत जास्त कामगार नवी मुंबईतील लागले पाहिजे. 26 फेब्रुवारीला धाराशिव मधील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या जिल्ह्यात आरोग्याची दुरावस्था. एक महिना झाला काहीच सुधारले नाही. लगेच दुरुस्त करा अन्यथा स्वराज्य संघटना आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घेणार, अशा शब्दात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर संभाजीराजे यांनी टीका केली.

सावरकरांच्या मानहानीने महाराष्ट्र काँग्रेसची अडचण, ‘सामना’तून राहुल गांधींना ‘आस्ते कदम’चा इशारा
परवा माहीममध्ये एक वस्तू तोडून टाकली त्याचं कौतुक आहे, अफझल खानचे कबर काढलं कौतुक आहे. तसेच ज्या किल्ल्यांनी संरक्षण दिलं, वाचवलं तो विशालगड. त्याची दुरवस्था झालेय. तात्काळ तेथील अतिक्रमण काढा. तुम्ही ताकद द्या, २०२४ ला बदल दिसेल. स्वराज्य म्हणजे तुमचं राज्य. २०२४ तुमच्या हातात आहे. तुम्हाला आताचे पुढारी पाहिजेत की सुसंस्कृत पुढारी पाहिजे हे तुम्हाला निवडायचंय, असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केले.

सदू-मधू एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले होते; राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राऊतांची खोचक टिप्पणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here