सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे एक भरधाव चारचाकी गाडी रसवंतीगृहात घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समर्थ संतोष शिंदे (वय ११) असं मृत मुलाचे नाव आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

तासगाव भिलवडी रस्त्यालगत खंडोबाचीवाडी येथे एका पेट्रोल पंपाच्या जवळ शेताकडेला असणाऱ्या वडिलांच्या रसवंतीगृहात समर्थ बसला असता अचानक रसवंतीगृहात घुसली. ज्यामध्ये रसवंतीगृहाची पत्र्याची पूर्ण शेड उचकटून कोसळले तसेच यावेळी गाडीच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने समर्थ शिंदेचा जागीच ठार झाला. भिलवडी स्टेशन वरून तासगावकडे जात असताना ही भरधाव गाडी रसवंती गृहात घुसन हा भीषण अपघाता झाला आहे.

सदू-मधू एकमेकांचे अश्रू पुसायला भेटले होते; राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राऊतांची खोचक टिप्पणी
समर्थ संतोष शिंदे हा इयत्ता पाचवीत शिकत होता. समर्थ आपल्या वडिलांच्या रसवंतीगृहामध्ये देखील त्यांना हातभार लावायचा. त्याचप्रमाणेच तो रविवारी दुपारी सुट्टी असल्याने आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी रसवंतीगृह या ठिकाणी आला होता. रसवंती गृहात बसला असता त्याच्यावर काळाने घाला घातला.

ही घटना इतकी भीषण होती की, गाडी आत घुसल्यानंतर संतोष हा गाडीसोबतच फरफटत गेला आणि पुढच्या चाकात येऊन चिरडल्याने तो जागीच ठार झाला. शिवाय या अपघातात गाडीने रसवंती गृहाचे शेड देखील उखडून काढले होते. त्यामुळे या संपूर्ण पत्राचा शेड शेजारच्या शेतामध्ये जाऊन कोसळला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यावर समर्थ याच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून शिंदे कुटुंबियांचा एकच आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला.

अपघाताच्या घटनेनंतर कार चालक जो आहे, तो फरार झाला आहे घटनास्थळी भिलवडी पोलिसांनी धाव घेऊ घटनेचा पंचनामा केला आहे,भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे,अपघात प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला असून अधिक तपास भिलवडी पोलीस करत आहेत.

Parshuram Ghat: कोकण-गोव्यात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परशुराम घाट आजपासून बंद नाही, पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here