Man Threatens To Kill Self At Csmt: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये शनिवारच्या रात्री मोठा थरार घडला. एक तास चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता

मेल एक्स्प्रेससाठी असलेल्या नऊ नंबरवरील प्लॅटफॉर्मवर असलेल्या ओव्हर रेड वायरच्या जवळील खांबावर तो चढला होता. ओव्हर हेड वायरही हाय व्होल्टेज असते त्यामुळं या वायरीला हात जरी लागला असता तरी त्या व्यक्तीचा जळून कोळसा होतो. त्यामुळं सर्वातप्रथम आरपीएफने प्रसांगावधान राखत ओव्हरहेड वायरचा विद्युत प्रवाह थांबवला. जेणेकरुन त्याला शॉक लागू नये. त्यानंतर अग्नीशमन दल आणि पोलीसांना त्याला खाली उतरवण्यात यश आले. पुलावरुन खाली उतरल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.