पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचं सांगून आरोपींनी पैसे मगितल्याचं कळत आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकाला बोगस फोन असल्याचा संशय आला. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे (वय ३५ वर्ष, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क साधला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली.

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिल्याचा आरोप आहे

सावरकरांच्या मानहानीने महाराष्ट्र काँग्रेसची अडचण, ‘सामना’तून राहुल गांधींना ‘आस्ते कदम’चा इशारा
आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद पवारांच्या तोंडाला मास्क लावून बॉर्डरवर उभं केलं तर कोणी ओळखणार नाही | गोपीचंद पडळकर

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे या प्रकरणात तपास करत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील शहरात अशाच प्रकारे राजकीय नेत्यांच्या नावांचा वापर करून, त्यांच्या पीएचे नाव वापरून खंडणी मागितल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये आरोपींनी विशिष्ट अशा सॉफ्टवेअरचा वापर केला होता.

पांढरं रंगवलं म्हणून व्हाईट हाऊस होत नाही, नवी मुंबईत संभाजीराजे गणेश नाईकांवर बरसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here