मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२२-२३ हंगामासाठी वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने A+ श्रेणीतील आपले स्थान कायम ठेवले आहे. दुखापतीमुळे जवळपास ६ महिन्यांपासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. BCCI ने A+ श्रेणीतील खेळाडूंकडून वार्षिक निधी ७ कोटी देते. पण बराच काळ संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराहदेखील या A+ श्रेणीत असल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. टीम इंड्याबाहेर असूनही बुमराहला का या श्रेणीत ठेवले आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत. बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे यात शंका नाही, परंतु बीसीसीआयचा हा करार ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या हंगामासाठी आहे आणि जर आपण बुमराहबद्दल बोललो तर त्याने २५ सप्टेंबर २०२२ पासून भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही आणि तो संघात केव्हा परतेल, याबाबत अजून काही अपडेट नाही. अशा स्थितीत मंडळाने त्याला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठ्या करारात कशाच्या आधारे कायम ठेवले, यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

BCCI कडून टीम इंडियाचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर; जडेजा-हार्दिकचं प्रमोशन; तर राहुलला मिळाला धक्का
पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह गेल्या काही वर्षांत अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकला आहे. गेल्या वर्षीही त्याच्यासोबत असेच काहीसे घडले होते. पाठीच्या समस्येमुळे त्याला टी-२० विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. त्याला नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधूनही बाहेर पडावे लागले. बुमराहला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये डिमोशन मिळायला हवे होते, असे लोकांचे म्हणणे आहे. A+ श्रेणीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

यावेळी सर्वात मोठ्या श्रेणीत ३ ऐवजी ४ खेळाडू सहभागी झाले होते. या करारानंतर बुमराहच्या नावावरुन गदारोळ झाला आहे. तर हार्दिक पांड्या आधीच्या करारात दुखापतीमुळे २ ग्रेड घसरला होता. खरे तर गेल्या वर्षी जुलैमध्येच पांड्या वर्षभरानंतर संघात परतला होता. तो बर्‍याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होता, ज्याचा त्याला २०२१-२०२२ च्या करारामधअये परिणाम जाणवला होता आणि तो थेट A वरून C श्रेणामध्ये गेला होता.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

अशा परिस्थितीत, दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर राहिल्यानंतर पांड्याच्या ग्रेडमध्ये २ ग्रेडची घसरण होऊ शकते, तर बुमराह A+ ग्रेडमध्ये कसा राहील, यासोबतच त्याच्या संघात पुनरागमनालाही अजून वेळ लागू शकतो. वास्तविक गेल्या वर्षी पाठीत स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. आता तर तो यंदाचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्यावरही धोका निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here