लंडन: डास जो आकाराने अत्यंत लहान असतो, पण अनेकदा त्यामुळे व्यक्ती गंभीर आजारी पडतो. अनेकांना त्यामुळे जीव देखील गमवावा लागतो. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं आहे. डास चावल्यामुळे या महिलेला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि ती कोमात गेली. अखेर डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे हात-पाय कापावे लागले आहे. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही घटना एका ब्रिटिश महिला डान्सरसोबत घडली आहे. एकदा या महिला नृत्यांगनाला डास चावल्यानंतर तिला एक आजार झाला. या आजाराचे रूपांतर मलेरियामध्ये झाले. मलेरियावर उपचार करण्यासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिथूनच तिचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यास सुरुवात झाली. मलेरियाच्या आजारावर उपचार सुरू असताना त्या महिलेच्या शरीरात काही रिअॅक्शन्स झाल्या आणि ती आणखी आजारी पडली.

महिला मुख्यमंत्र्याबाबत आधी मी बोललो, आता काही नेते माझी कॉपी करतात; अभिजीत बिचुकलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, लंडनच्या केम्बरवेलमध्ये राहणाऱ्या या महिला डान्सरचे नाव टैटियाना टिमोन आहे. काही वेळापूर्वी ती सुट्टीवर गेली होती आणि तिथे तिला डास चावल्यामुळे तिला मलेरिया झाला. रूग्णालयात उपचारादरम्यान तिला सेप्सिस होऊ लागला, त्यामुळे औषध देऊन तिला बेशुद्ध करण्यात आलं. पण, त्याचा आजार बरा होण्याऐवजी आणखी वाढत गेला. उपचारादरम्यान ती काही काळ कोमातही राहिली.

मुलगा सतत आजारी, तांत्रिक म्हणाला बळी दे, मग १० वर्षांच्या भावासोबत जे घडलं ते हादरवणारं
अखेर परिस्थिती अशी झाली की संसर्ग वाढल्यानंतर तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय आणि हात कापावे लागले. याने तिचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोनाच्या काळात तिला पहिल्यांदा हा आजार झाल्याचं माहिती झालं. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिला मलेरिया झाल्याचे आढळून आले. यानंतर तिचा आजार खूप वाढला. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले असले तरी हात-पाय गमावल्याने ती खूप दुःखी आहे.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here