मुंबई : देशातील टॉप ७ शहरांमध्ये या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एक लाख १३ हजार ७७० युनिट्स म्हणजेच घरांची विक्री झाली. टॉप ७ शहरांमध्ये ही घरे विकली गेली असून घर खरेदीदारांनी या तिमाहीत प्रचंड रस दाखवला आणि मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली. पहिल्या तिमाहीत एक लाखाहून अधिक घरांची विक्री झाली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १४% अधिक आहे.घर खरेदीला मोठा प्रतिसाद
जागतिक आर्थिक घडामोडींमुळे बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीचा सपाटा सुरू असताना भारतीय गृहबाजार तेजीत दिसत आहे. कॅलेंडर वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च दरम्यान, घरांच्या विक्रीमध्ये प्रचंड मागणी दिसून आली आहे. या तिमाहीतील घरांची विक्री गेल्या दशकात सर्वकालीन उच्च पातळीवर आहे. पहिल्या तिमाहीत १,१३,७७० युनिट्स किंवा घरांची विक्री झाली.

गृहकर्जाच्या महागड्या व्याजदराने नाकी नऊ आले… मग ओझे हलकं कारणासाठी काय कराल? वाचा एका क्लिकवर
घर खरेदीदारांनी या तिमाहीत प्रचंड रस दाखवला आणि मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली. पहिल्या तिमाहीत एक लाखांहून अधिक घरांची विक्री झाली. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १४% अधिक आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ९९,५५० घरे विकली गेली होती. देशातील आघाडीची रिअल इस्टेट सेवा कंपनी ANAROCK च्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे.

CIBIL Score: कर्जं चुकवल्यामुळे सिबिल स्कोअर बिघडला? जाणून घ्या आता काय कराल
लाखाहून अधिक घरांची विक्री
मुंबई महानगर प्रदेश (MMR)आणि पुणे येथे सर्वाधिक घरे विकली गेली आहेत. पहिल्या ७ शहरांमध्ये या दोन्ही क्षेत्रांमध्ये ४८ टक्के वाढ झाली आहे. पुण्यात वार्षिक ४२% वाढ झाली आहे. एमएमआर आणि पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री झाली असून ७ शहरांपैकी फक्त दोन शहरांमध्ये ५२% घरांची विक्री झाली.

घर की किल्ला? पुण्यातील शिवप्रेमी युवकाची कमाल; उभारलं चक्क किल्ल्याचं घर

कोणत्या विभागात किती घरे विकली गेली
ANAROCK च्या माहितीनुसार ४०-८० लाख रुपयांच्या दरम्यानच्या घरांना सर्वाधिक मागणी दिसून आली. या विभागाचा एकूण विक्रीत ३६% वाटा होता. त्याच वेळी प्रीमियम सेगमेंटमध्ये २४% म्हणजेच ८० लाख ते १.५ कोटी रुपयांच्या सेगमेंटमध्ये विकली गेली. आणि १८ टक्के परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये म्हणजेच ४० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची घरांची विक्री झाली.

देशातील टॉप ७ शहरांमध्ये २०२३ च्या पहिल्या तिमाहीत १,०९,५७० नवीन प्रकल्प लाँच करण्यात आले. तर २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८९,१४० युनिट्स लाँच करण्यात आल्या. नवीन लाँच समाविष्ट असलेल्या शहरांमध्ये मुंबई महानगर प्रदेश, हैदराबाद, पुणे आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here