‘मी जवळपास ३ ते ४ महिने कुटुंबातील कोणालाच टॅटूबद्दल सांगितलं नाही. माझ्या बाबांना टॅटूविषयी समजलं. त्यानंतर मला त्यांनी बेदम मारलं. टॅटू काढल्यानंतर मी घाबरलो होतो. टॅटू काढणाऱ्यानं त्या सुईचा वापर आणखी किती टॅटू काढण्यासाठी केला असेल याबद्दल मी अनभिज्ञ होतो. त्यामुळे मी एचआयव्ही चाचणी केली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह यावा अशी प्रार्थना मी करतो,’ असा किस्सा धवननं सांगितला.
धवननं त्याच्या पहिल्या टॅटूची कहाणी सांगितली. ‘मी पाठीवर विंचू काढला होता. काहीतरी वेगळं करायचं हाच विचार त्यावेळी माझ्या मनात होता. त्यानंतर मी त्याच्यावर डिझाईन काढली. पुढे मी हातावर भगवान शंकराचा टॅटू काढला. अर्जुनचाही टॅटू काढून घेतला,’ अशा आठवणी धवननं सांगितल्या.
गळ्यात रुद्राक्षाची माळ, सोवळं परिधान करुन विराटनं अनुष्कासह घेतलं महाकालेश्वराचं दर्शन
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं धवन म्हणाला. संघात परतण्याच्या आशा कायम आहेत. तसा विश्वास माझ्या मनात आहे. त्यासाठी कठोर मेहनत सुरू आहे. जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा त्या संधीचं सोनं करेन आणि उत्तम कामगिरी करून दाखवेन, असं शिखरनं सांगितलं. मी मेहनत सुरूच ठेवली. संघात पुनरागमन करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मला संधी मिळाली नाही, तरीही मला त्याबद्दल खंत नसेल. माझ्याकडून जितकं शक्य आहे, तितकं मी करत राहीन. मेहनत करणं माझ्या हातात आहे. त्यात मी कुठेच कमी पडणार नाही, असं शिखरनं म्हटलं.