लातूर : जिल्ह्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. लातूरमधील औसा निलंगा मार्गावर कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मेहुण्याच्या लग्नाला गेल्या कुटंबावर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगातील कार पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. यामधे नवरदेवाच्या भावासह तीन भाच्यांचा समावेश आहे. हा अपघात निलंगा जवळ घडला.
निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर यांच्या मेहुण्याचे पुण्याला लग्न होते. त्यासाठी ते सहकुटुंब पुण्याला गेले होते. आज सकाळी ते पुण्याहून कारने घरी परत येत असताना निलंगा महामार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ कारचा भीषण अपघात झाला. कारच्या भरधाव वेगामुळे सचिन बडूरकर याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात चालक सचिन बडूरकर यांचे दोन मुले एक पुतण्या आणि नवरदेवाचा सख्खा भाऊ ( सचिन बडूरकर यांचा मेहुणा) घटनास्थळीच ठार झाले. तर त्यांची मुलगी तसेच पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर येथे उपचार करण्यात येत आहेत. सचिन बडूरकर आणि त्यांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर निलंगा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची किल्लारी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील औसा – निलंगा रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं आहे. अपघातातील सर्व मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं ते म्हणाले. बडूरकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत, हीच प्रार्थना! करत असल्याचं ट्विट धीरज देशमुख यांनी केलं.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार