मुंबई- केसदरम्यान मुंबई आणि बिहार पोलिसांमधला वाद वाढत जाताना दिसत आहे. सुशांतच्या पैशांची चैकशी का करण्यात आली नाही असा प्रश्न बिहारचे डीजीपी यांनी मुंबई पोलिसांना विचारला. पांडेय यांची ओळख निर्भीड आणि स्पष्टव्यक्ता अधिकारी अशी आहे.

डीजीपी यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘गेल्या चार वर्षात सुशांतच्या अकाउंटमध्ये जवळपास ५० कोटी रुपये आले आणि आश्चर्य म्हणजे हे पैसे काढण्यातही आले. एका वर्षात त्याच्या अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये आले आणि त्यातून १५ कोटी रुपये काढण्यातही आले. यावर चौकशी होणं गरजेचं नव्हतं का? आम्ही शांत बसणार नाही. अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांना दाबण्यात का आलं हा प्रश्न आम्ही मुंबई पोलिसांना विचारणार आहोत.’

रविवारी बिहार पोलिसांच्या टीमला लीड करण्यासाठी सिटी एसपी विनय तिवारी मुंबईत पोहोचले. मात्र त्यांना बीएमसीकडून क्वारन्टीन करण्यात आलं. यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ते म्हणाले की, ‘या केसशी निगडीत पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आम्हाला देण्याऐवजी त्यांनी तिवारी यांना हाउस अरेस्टच केलं. अशाप्रकारचा असहयोग यापूर्वी आम्ही कोणत्याही राज्यात पाहिला नाही. जर या प्रकरणात प्रामाणिक असती तर त्यांनी आमच्यासोबत सगळे रिपोर्ट शेअर केले असते.’

यासोबतच सुशांत केसशी निगडीत अनेक प्रश्न बिहार पोलिसांनी उपस्थित केले. यानंतर मुंबई कमिश्नर परमबीर सिंग यांनी मीडियाशी संवाद साधताना या प्रकरणाची चौकशी योग्यप्रकारे आणि अगदी प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचं सांगितलं.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह अन्य चारजणांवर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपासह एफआयआर दाखल केली. यानंतर बिहार पोलिसांची चारजणांची टीम मुंबईत दाखल झाली. याच टीमचं नेतृत्व करण्यासाठी सिटी एसपी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. बिहार पोलिसांनी विनय तिवारी यांना जबरदस्तीने क्वारन्टीन केल्याचा आरोप केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here