भोपाळ: बडे नेते, मंत्री, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू यांच्या सुरक्षेसाठी पोलीस, कमांडो, खासगी सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी २४ तास बंदोबस्त तैनात असतात. मात्र एका झाडाच्या सुरक्षेसाठी पोलीस २४ तास तैनात असतील तर? झाडेच्या सुरक्षेवर लाखोंचा खर्च केला जात असेल तर? मध्य प्रदेशच्या रायसेनमध्ये सांची स्तूपाजवळ एक व्हीआयपी झाड आहे. या झाडेच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस तैनात असतात. व्हीआयपी झाडाला बोधी वृक्ष म्हटलं जातं. या झाडाच्या सुरक्षेसाठी २४ तास पोलीस कर्मचारी तैनात असतात. डोळ्यात तेल घेऊन ते झाडाची राखण करतात. या झाडाला आता लीफ कॅटर नावाचा आजार झाला आहे. त्यामुळे किटक झाडाचं नुकसान करत आहेत. बोधी वृक्षाची पानं सुकू लागली आहेत. २१ सप्टेंबर २०१२ रोजी श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत सांचीच्या बौद्ध विद्यापीठ परिसरात बोधी वृक्षाचं रोप लावलं. त्याचा आता वृक्ष झाला आहे.
सीफेसवर जॉगिंग करताना CEOचा अपघाती मृत्यू; आरोपीचा ब्लड रिपोर्ट आला; महत्त्वाची माहिती उघड
झाडाच्या सुरक्षेसाठी १ ते ४ पोलीस कर्मचारी हजर असतात. झाडाची काळजी घेण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. आतापर्यंत हा खर्च ६४ लाख रुपयांच्या घरात गेला आहे. झाडाची गळणारी पानंदेखील गोळा करून ती सुरक्षित ठेवली जातात. या झाडाचं एकही पान तोडल्यास कारवाई होऊ शकते.

झाडात इतकं विशेष काय?
गौतम बुद्धांनी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या केली. त्यांना झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली. त्याच झाडाची फांदी तोडून सांचीमध्ये लावण्यात आली. हळूहळू फांदीचं झाड झालं. गौतम बुद्धांना झाडाखाली तपश्चर्या केल्यावर आयुष्याबद्दल बोध झाला. त्यामुळेच या वृक्षाला बोधी वृक्ष म्हटलं जातं. बिहारच्या बोधगयामधून फांदी आणून ती सांचीत लावण्यात आली होती.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

सांची स्तूपाजवळील झाडाच्या संरक्षणाची जबाबदारी मध्य प्रदेश सरकारची आहे. या झाडाला नियमितपणे पाणी, खत, सुरक्षा देण्याची जबाबदारी वन, महसूल, पोलीस विभाग आणि सांची नगर परिषदेकडे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here