दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथून धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वे गाडीखाली टाकून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रकाश शिवाजी शेळके (वय ४३ वर्षे, व्यावसाय- नोकरी, राहणार- केडगाव, शिंदे हॉस्पिटल तालुका- दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून यवत पोलिसांनी बाळासाहेब उर्फ महेंद्र सोडणवर (राहणार- केडगाव,पिसेवस्ती तालुका- दौंड, पुणे) आणि बाळासाहेब भागुजी रुपणवर (राहणार- दापोडी, तालुका-दौंड) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शुभम शेळके असे अपहरण करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश शिवाजी शेळके यांचा मुलगा शुभम याचे आरोपी बाळासाहेब सोडणवर व बाळासाहेब रुपणवर या दोघांनी एका विशिष्ट कारणावरून शुभम यास मारहाण केली. त्यानंतर त्याचे स्कॉर्पिओ एम. एच. 42 – ए.डी. 8055 यामध्ये बसवून त्याचे अपहरण केले. तसेच त्याचे हातपाय बांधून त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने रेल्वे गाडीखाली फेकून देण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी नमूद केले आहे.

परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू
फिर्यादी प्रकाश शिवाजी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here