नागपूर : पारशिवनीजवळील नायकुंड परिसरात ड्रीम व्हिला फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यादरम्यान एका तरुणीला पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून ताब्यात घेतले. विद्यार्थिनीसोबत वेश्या व्यवसाय करवणाऱ्या रेस्टॉरंट मॅनेजर आणि त्याच्या सहाय्यकाला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम कारेमोरे (वय ३०, सावनेर) आणि सुनील चंद्रभान मेश्राम (वय ४०, उमरेड बायपास, सावनेर) अशी दलालांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील मेश्राम हे ड्रीमविला फॅमिली रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आहेत. या हॉटेलला मोठ्या संख्येने ग्राहक येत असत. तिथेच हे रॅकेट सुरु होतं. आरोपी शुभम कारेमोरे झटपट पैसे कमवण्यासाठी मुली शोधत होता. पाच मुली वेश्या व्यवसायासाठी तयार होत्या, अशीही माहिती चौकशीत समोर आलीये.

संबंधित मुली महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांना शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याने त्या अशा कामासाठी तयार झाल्या होत्या. आरोपी शुभमने मुलींसाठी प्रति ग्राहक ५०० रुपयांचा सौदा निश्चित केला. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांकडून शुभम आणि सुनील चार ते पाच हजार घ्यायचे.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
हॉटेलमध्ये मुलींची वर्दळ वाढल्याने अनेक ग्राहक शनिवार आणि रविवारी पार्टीसाठी येत होते. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र निकम यांना ही माहिती मिळाली. त्यांनी बनावट ग्राहक पाठवले. शुभमने एका बनावट ग्राहकाशी ५ हजार रुपयांमध्ये सौदा केला.

ठाकरेंचा सैनिक गेला, पैशाविना मृतदेह रुग्णालयात पडून, CMO मधून फोन, क्षणात सूत्रं फिरली
ग्राहकाला ज्या खोलीत तरुणीला ठेवण्यात आले होते, तेथे पाठविण्यात आले. काही वेळाने बनावट ग्राहकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने छापा टाकून मुलीला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या सुनील आणि शुभमला पोलिसांनी अटक केलीये. दोघे गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याचे आरोपींनी मान्य केले. सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस पुढील कारवाई करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here