अमरावती : काही दिवसांपूर्वी पहाटे चार वाजताच्या दरम्यान शिवपार्वतीनगरात सिने स्टाइलने घडलेल्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढून महामार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून पळ काढला. हे वाहन ज्याचा खून झाला त्याच युवकाची होती. मात्र त्या भरधाव वाहनाचा देखील रहाटगाव रिंगरोडनजीक अपघात झाला. तेथून आरोपी नेमक्या कोणत्या दिशेने आणि कुठे फरार झालेत याचा शोध पोलिसांच्या वतीने सुरू आहे. दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ आणि पोलीस स्टेशन गाठून मृतकाची ओळख पटविली. अजिन खान खालिद खान (२४, राहणार- मोमीनपुरा, नागपूर) असे कालच्या घटनेतील मृतकाचे नाव असून तो वाहनचालक असल्याचे निष्पन्न झाले. अजिन खान खालिद खान हा शनिवारी नागपूर येथून त्याच्या वाहन क्र. एम.एच. १९ एफ-१२३८ ने भाडे घेऊन अमरावतीकडे आला होता. दरम्यान रविवारी पहाटे ही घटना घडली. मात्र घटनेतील आरोपी नागपूरहून वाहनात आले होते की इतर ठिकाणावरून ते वाहनात बसले हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आरोपीबाबत ठोस पुरावा मिळाला नसल्याने प्रकरणातील सत्यता अद्यापही गुलदस्त्यात आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेतील अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून सोमवारी फॉरेन्सिक लॅबच्या चमूने वाहनाची तपासणी करून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले
घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रकरणातील गुंता कायम असून पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा आज घटनास्थळी भेट देऊन घटनेतील मुख्य साक्षीदार लक्ष्मण शिंगणजुडे यांच्याशी चर्चा केली. पोलिसांची चमू वेगवेगळ्या दिशेने आरोपींच्या शोधात गेले असून लवकरच या घटनेतील आरोपींना जेरबंद करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिले आहे.

पुणे हादरला! आधी मुलाचे अपहरण, नंतर हातपाय बांधून ट्रेनखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
अजिन खानचा झाला होता साखरपुडा

घटनेतील मृतक अजिन खान याचा नुकताच साखरपुडा झालेला होता आणि लवकरच त्याचा निकाह देखील होणार होता, असे त्याच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. प्रामाणिक काम करणाऱ्या अजिनचे कुणासोबतही वैर नव्हते. मात्र या घटनेवर आमचा अजूनही विश्वास बसत नसल्याचे मृतक अजिनच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here