ूबारामती: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबंधित करताना त्यांनी बारामतीत येणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा तर साधलाच, मात्र स्वपक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. शहरातील एका सामान्य कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला.. यावेळी पवार म्हणाले की, काही पदाधिकारी पनवेल ला जातात असं कानावर आल आहे. काहीजण स्वतःचाच गट तयार करतात.. काहींना संचालक म्हणून घेणार आहे असं सांगतात… असे म्हणत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. असा इशाराच पवारांनी यावेळी दिला..बारामती बाजार समिती, दूध संघ व निरा बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील राष्ट्रवादी भवन येथे मेळावा पार पडला यावेळी पवार बोलत होते.

आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील पुन्हा आमने सामने
नुकताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दौरा झाला. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, वेगवेगळ्या लोकांना आता बारामतीचे प्रेम खूप उतू चाललंय, कोण कुळे येतायत तर कोण येतात.. हा त्यांचा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. तसेच विरोधक आल्यानंतर आपल्यामध्ये काही गडबड होणार नाही. असे म्हणत, ‘काही नाही दादा सहज जाऊन बसलो होतो;, हे चालणार नाही असे म्हणून संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव पदावरून काढले जाईल असा इशाराच त्यांनी दिला.
रहाटगावजवळील अपघातातील त्या मृताची अखेर ओळख पटली, होणार होता निकाह, कुटुंबीय म्हणाले…
‘राज्यात ठीकठिकाणी महाविकास आघाडीच्या जाहीर सभा होणार’

२ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार आहे. याची जबाबदारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर दिली आहे. त्यानंतर अमरावती विभागात होणाऱ्या सभेची जबाबदारी यशोमती ठाकूर यांच्याकडे सोपवली आहे. नाशिक येथेही सभा होणार असून त्याची जबाबदारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले
पुण्यात होणाऱ्या सभेची जबाबदारी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे, तर मुंबई विभागात होणाऱ्या सभेची जबाबदारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सेवेची जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे दिले आहे अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बारामतीत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here