मंडणगड : जिल्ह्यात दापोली मंडणगड मार्गावर दुधेरे येथे झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात चिपळूण पिंपरी येथील पार्थ विजय इंदुलकर या युवकाचा दुर्दैवीरीत्या जागीच मृत्यू झाला असून खेड येथील सिध्दांत अरविंद माने हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथे राज्यमार्गावरील पुलालगत रविवारी मध्यरात्री उशिरा किंवा पहाटेच्या काळोखात हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. रस्ता बाजूला खोल पडल्याने हा अगोदरचे कोणाच्या लक्षात आले नव्हते मात्र सकाळी हा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान
झालेल्या (मोटार सायकल एम.एथ. शुन्य 8 ए.एम. 3556 ) दुचाकीच्या या अपघातात चिपळूण येथील तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. दुचाकीवरून प्रवास करणारा दुसरा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अधिक उपचाराकरिता तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

या संदर्भात पोलीसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार दुधेरे पुलानजीक रविवारी मध्यरात्रीनंतर मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीस अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिकांना सकाळी गाडीचा चालक बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्यांनी ही माहीती सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तात्काळ मंडणगड पोलीसांना कळवली व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या अपघतात दुचाकीवरुन प्रवास करणारा पार्थ विजय इंदुलकर (वय १७ वर्षे, राहणार- पिंपळी, तालुका- चिपळूण) याचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला. मोटार सायकल चालक सिध्दांत अरविंद माने (वय १८ वर्षे, राहणार- भडगाव, तालुका- खेड) हा या अपघातात गंभीर जखमी अवस्थेत अत्यवस्थ असलेला आढळून आला. १०८ रुग्णवाहीकेच्या मदतीने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलवण्यात आले. अपघात कसा झाला या संदर्भात स्थानीक पोलीस अधिक तपास करीत आहेत. या अपघाताची नोंद मंडणगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या सगळ्या अपघात प्रकरणाचा तपास मंडणगड तालुक्याच्या पोलीस निरीक्षक शैलजा सावंत करत आहेत

या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला पार्थ विजय इंदुलकर हा खेड येथील ज्ञानदीप कॉलेज मध्ये शिकत होता. इयत्ता ११ वी कॉमर्सची त्याने परीक्षा दिली होती. पार्थचे बारावीचे क्लास चालू होते. पार्थच्या मृत्यूमुळे पिंपळी परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पार्थ याच्यावरती अत्यंत शोकाकुल वातावरणात पिंपरी येथे सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here