मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला एक दिवस उरला असतानाही त्यावरून राजकीय टीकाटिप्पणी सुरूच आहे. राम मंदिराचे ऑनलाइन भूमिपूजन करण्याचा सल्ला देणारे मुख्यमंत्री यांना भाजपचे नेते अॅड. यांनी ऑनलाइन प्रवासी पासच्या मुद्द्यावरून बोचरा टोला हाणला आहे.

गणपतीसाठी मुंबई, पुण्याहून आपापल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडथळे येत आहेत. ई पास हा त्यातील सगळ्यात मोठा अडथळा ठरला आहे. ई पाससाठी अर्ज केल्यानंतरही तो मिळणं दुरापास्त झालं आहे. दलालांच्या मार्फत मात्र सहज पास मिळत आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. गणपतीपर्यंत घरात जायचे असल्यास कोणत्याही परिस्थितीत सहा तारखेच्या आधी गावात पोहोचणे आवश्यक आहे. दुसरीकडे एसटीच्या गाड्या सोडण्याचा निर्णय अद्याप सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळं चाकरमान्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

वाचा:

या पार्श्वभूमीवर शेलार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राम मंदिराचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करा, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचा संदर्भ देत शेलार यांनी ठाकरेंना टोला हाणला आहे. ‘ई- भूमीजन” करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप “ई पास” देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा! चाकरमान्यांच्या प्रवासाबाबत मुख्यमंत्री घोषणा करणार होते. एसटीच्या गाड्या सोडणार होते. हे सगळं कधी करणार,’ असा सवाल शेलार यांनी केला आहे. ‘कोकणी माणसाच्या संयमाचा अंत पाहू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

चाकरमान्यांच्या अँटीबॉडी टेस्ट मोफत करा!

‘आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे २५० रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा. त्यांना सुरक्षित सन्मानाने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या. बघ्याची भूमिका न घेता तातडीने निर्णयाची घोषणा करा,’ अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here