नेपाळ: एका ४७ वर्षीय नेपाळी व्यक्तीने दारूच्या नशेत एक विचित्र कृत्य केलं आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या व्यक्तीच्या गुदद्वारात स्टीलचा ग्लास अडकला होता. शस्त्रक्रिया करून तो ग्लास डॉक्टरांनी बाहेर काढला. तीन दिवस हा ग्लास या व्यक्तीच्या गुदद्वारात होता.या विचित्र प्रकरणाबाबत जर्नल ऑफ नेपाळ मेडिकल सेंटरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सुरुवातीला या व्यक्तीने सांगितले की, ग्लास चुकून आत गेला. नंतर त्याने स्वतः कबुली दिली की त्याने नशेत असताना लैंगिक समाधानासाठी हे केले.

२ कोटी कॅश, ६२ एकर जमीन, १ किलो सोनं; चार भावांकडून लाडक्या बहिणीला ८ कोटींच्या भेटवस्तू
अहवालानुसार, त्याच्या कृतीमुळे तो दोन दिवसांपर्यंत मल करू शकला नाही. त्याला दोन दिवस असह्य वेदना होत होत्या. तो गॅसही पास करू शकला नाही. मात्र, सुदैवाने त्याला रक्तस्त्राव झाला नाही. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले की त्याने स्वतः ग्लास काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.

सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. तसेच, ग्लास काढण्याचा प्रयत्न केला. पण, तो गुदद्वाराच्या आत उलटा अडकलेला होता. यानंतर डॉक्टरांनी एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी (Exploratory laparotomy) शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया पोटासाठी केली जाते. पण, डॉक्टरांना त्यातही अपयश आले. त्यानंतर डॉक्टरांनी एंटरोस्टोमी (Enterostomy) शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी ग्लास यशस्वीपणे काढला.

बापरे! डास चावल्याने महिला थेट कोमात, जीव वाचवण्यासाठी हात-पाय कापावे लागले…
या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला ७ दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले. सुमारे दोन महिन्यांच्या फॉलोअपनंतर, डॉक्टरांनी सांगितले की व्यक्ती आता पूर्णपणे बरी आहे. डॉक्टर त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here