नवी दिल्ली : उद्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यासाठी अयोध्यानगरीतील १७५ मान्यवरांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. यात पहिलं आमंत्रण अयोध्या खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना धाडण्यात आलंय. तसंच जवळपास १० हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय. मात्र, हिंदू महासभेनं या सोहळ्यात ‘विधर्मी’ अर्थात ‘गैर हिंदूं’ना प्रवेश न देण्याची मागणी करत थेट गृहमंत्र्यांना रक्तानं लिहिलेलं पत्र धाडलंय.

भूमिपूजन सोहळ्यासाठीच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व महंत नृत्य गोपाल दास हे पाच जण विराजमान असणार आहेत.

रक्तानं लिहिलं पत्र!

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र धाडलंय. जीटी रोड स्थित कार्यालयात कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांनी हे पत्र चक्क रक्तानं लिहिलंय. भूमिपूजनात सहभागी होणाऱ्या गैर हिंदू व्यक्तींना अशा शुभप्रसंगी प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी हिंदू महासभेनं केलीय. रक्तानं पत्र लिहून हिंदू महासभेनं गृहमंत्र्यांकडे ‘विधर्मी’ फैज खानला प्रवेश न देण्याची मागणी केलीय. राम जन्मभूमी हे एक धार्मिक स्थल आहे. कोणतंही ‘धर्मनिरपेक्ष’ कार्यालय नाही, असंही हिंदू महासभेनं म्हटलंय.

कोण आहेत पूजा शकून पांडेय?

या अगोदर हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय महात्मा गांधींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून चर्चेत आल्या होत्या. यावेळी, पुतळ्यावर पेट्रोल टाकून मिठाई वाटप करताना हिंदू महासभेच्या सदस्यांनी ‘गोडसे झिंदाबाद’चे नारेही दिले होते.

वाचा :

वाचा :

कोण आहे फैज खान?

राम जन्मभूमी भूमिपूजनासाठी छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या चंद्रखुरी स्थित कौशल्या माता मंदिरातून माती घेऊन नावाचा व्यक्ती अयोध्येत दाखळ होणार आहे. भगवान श्रीरामांच्या आजोळीची मातीही अयोध्येत मंदिराच्या पायाभरणीत टाकली जावी अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी, रायपूर ते अयोध्या असा ७९६ किलोमीटरचा प्रवास ते पायी चालत पूर्ण करणार आहेत. दररोज ६० किलोमीटर चालून फैज खान ५ ऑगस्टला अयोध्येत दाखल होणार आहेत.

वाचा :

वाचा :

हिंदू महासभेच्या वकिलांचंही ‘ट्रस्ट’ला पत्र

तसंच हिंदू महासभेचे वकील हरी शंकर जैन आणि इतर वकील भक्तांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी जन्मस्थळावर कोणत्याही मुस्लीम किंवा गैर हिंदू व्यक्तीला बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केलीय. जर बोलावण्यात आलं तर कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी या पत्रात देण्यात आलीय. ‘मक्का मदिन्यात हिंदुंना प्रवेश निषेध आहे मग राम मंदिरात मुस्लिमांना कसा प्रवेश दिला जाऊ शकतो?’ असं त्यांचं म्हणणं आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here