बंगळुरु : निर्जन ठिकाणी प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असताना प्रेयसीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अतिरक्तस्रावामुळे तरुणीने प्राण गमावल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक म्हणजे मयत तरुणी अल्पवयीन होती. कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास हाती घेत पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडिता व १८ वर्षीय आरोपी दोघेही कागलीपुरा येथील जवळच्या गावातील रहिवासी आहेत. एकत्र शिकत असताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती, तर आरोपी कॉलेज ड्रॉप आऊट आहे. तो सध्या रोजंदारीवर काम करतो.

आरोपी आणि मृत तरुणीचे प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला निर्जन स्थळी नेले आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे आश्वासन दिले. संभोग करत असताना पीडितेला अतिरिक्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला, या कारणामुळे तिचा मृत्यू झाला.

माझी मुलगी आरोपीला काही काळापासून ओळखत होती. आम्ही तिला त्याच्यापासून दूर राहण्यास खडसावलं होतं. तिने त्याच्याशी संबंध तोडलेले, मात्र त्याने कसातरी तिच्याशी संपर्क साधला, असे मयत तरुणीच्या वडिलांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी त्याने मला फोन केला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती बेशुद्ध पडल्याचं त्याने सांगितलं. त्याने तिला पाणी दिलं, मात्र प्रयत्न व्यर्थ ठरले. आम्ही तिला घेऊन तीन खासगी रुग्णालयांत फिरलो. शेवटच्या ठिकाणी हा गंभीर प्रकार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या मुलीने प्राण गमावले. तिच्या मृत्यूला सर्वस्वी तरुणच जबाबदार असल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केला आहे.

आज जरा वेगळ्या पद्धतीने करुयात, महिलेचा नकार; तरुणाने जीव घेतला, मग मृतदेहासोबत शरीरसंबंध
दरम्यान, आरोपीने प्रेयसीची हत्या केली नाही. तरुणीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने मित्रांकडे मदत मागितली. मृतदेह शवविच्छेदनासाठी बंगळुरु-म्हैसूर रस्त्यावरील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

संजय राऊतांनी आम्हाला साथ दिली पण त्यांचा आवाज दाबला जातोय; बार्शीतील निर्भयाच्या आईचा टाहो

दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी कागलीपुरा पोलिस अधिकार्‍यांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह पॉक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here