– शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांची शेअर प्रमाणपत्रे प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या अशा गुंतवणूकदारांनी पॅन क्रमांक, नॉमिनेशन, संपर्क क्रमांक रजिस्ट्रार तसेच ट्रान्सफर एजंटना देणे आवश्यक आहे.
– याशिवाय, बँक खात्याचा तपशील आणि नमुना स्वाक्षरी हे देखील रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांना द्यावा लागणार आहे.
– वरील दोन्ही तपशील ३० सप्टेंबरच्या आधी न दिल्यास १ ऑक्टोबरपासून रिजिनल ट्रेड अॅग्रीमेंट्स (आरटीए) गोठवली जाणार आहेत.
– एकदा आरटीए गोठवली गेल्यास अशा शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सवर बोनस शेअर्स, लाभांश आदी मिळणार नाही.
– शेअर्स किंवा फोलिओ ३१ डिसेंबर २०२५पर्यंत गोठवलेल्या स्थितीत राहिल्यास संबंधित आरटीए आणि सूचिबद्ध कंपन्यांना या फोलिओंना बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) कायदा, १९८८ अंतर्गत आणावे लागणार आहे.
डीमॅट नॉमिनेशन न केल्यास
– डीमॅट खात्यांच्या नॉमिनेशनसाठी अंतिम तारीख ३१ मार्च ही आहे.
– या तारखेनंतर नॉमिनेशन न करणाऱ्या खातेदारांची खाती रक्कम काढण्यासाठी गोठवली जाणार आहेत.
– या खात्यांतून ३१ मार्चनंतर शेअर ट्रेडिंग करता येणार नाही.
– डीमॅट खाते अकार्यरत होईल.
– नॉमिनेशनसाठी मूळ अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ ही होती. ती एख वर्षाने वाढवून देण्यात आली आहे.
– नॉमिनेशनचा तपशील यापूर्वी दिलेल्या गुंतवणूकदारांनी पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.
नॉमिनेशन करताना…
– एक डीमॅट खात्यासाठी कमाल तीन नॉमिनी ठेवता येतात.
– एकापेक्षा अधिक नॉमिनी ठेवल्यास त्या प्रत्येक नॉमिनीला गुंतवणुकीतील किती टक्के हिस्सा मिळेल ते लिहून द्यावे लागते.
– नॉमिनी म्हणून नेमल्या जाणाऱ्या व्यक्तीविषय़ी संपूर्ण माहिती देणे बंधनकारक.
– प्रत्येक समभागासाठी वेगवेगळे नॉमिनेशन करण्याची गरज नसते.
– नॉमिनेशन हे केवळ डीमॅट खात्यासाठीच होते.