तर, बेपत्ता मुलीच्या शोधात पोलिसांनी उशिर केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोपही लोकांनी केला आहे. दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत रविवारी रात्री स्थानिकांनी तिढाळा पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केली.
तिळजला पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी मुलगी बेपत्ता झाली होती. आम्हाला पालकांकडून तक्रार मिळाली आणि खूप शोध घेतल्यानंतर आम्हाला तिचा मृतदेह एका स्थानिकाच्या अपार्टमेंटमध्ये गोणीत ठेवलेला आढळला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे आणि एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितलं. त्याच्या निपुत्रिक अवस्थेवर काहीतरी उपाय मिळावा म्हणून तांत्रिकाने त्याच्याकडे आणि त्याच्या पत्नीकडे संपर्क साधला. आरोपीने सांगितले की, एका तांत्रिकाने त्याला या नवरात्रीमध्ये ७ ते ८ वर्षाच्या मुलीचा बळी देण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून त्याला संतान प्राप्ती होईल. या प्रकरणातील आरोपी तांत्रिकाचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी तोडफोड केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.