मुंबई : एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेल्या दया नायक यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. नायक यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. २०२१ मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. प्रशासकीय बदलीचे कारण त्यावेळी पुढे करण्यात आले होते. परंतु बदलीच्या आदेशाला दया नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये रुजू झाले.

दया नायक यांच्यासह दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांची बदली रद्द करण्यात आली आहे.

निर्जनस्थळी प्रियकराशी शरीरसंबंध, अतिरक्तस्रावाने प्रेयसीचा मृत्यू; १८ वर्षीय तरुण अटकेत

दया नायक यांची कारकीर्द

दया नायक १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गुन्हे अन्वेषण विभागात काम सुरू केले. दया नायक हे शर्मांच्या एन्काउंटर पथकात होते. त्यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काउंटर केला होता. त्यांनी ८० हून अधिक गुंडांचे एन्काउंटर केल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख मिळाली.

महिला-पुरुषांसाठी एकच बाथरुम; भाड्याच्या घरात असलेलं पोलीस ठाणे अडचणीत, कर्मचारी हतबल

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना २००६ मध्ये पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. एसीबीने त्यांना अटकही केली. मात्र पुरावे सादर करता न आल्याने त्यांना क्लीन चिट देण्यात आली.

२०१२ मध्ये दया नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आधी त्यांची नियुक्ती मुंबईत, नंतर नागपूरला झाली. मात्र तिथे रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. २०१६ मध्ये निलंबनाची कारवाई मागे घेत त्यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली.

चिंगीला टेडीसारखी आंघोळ घालूया, दोन चिमुकल्या बहिणींचा अट्टाहास, पाण्यात बुडून बाळाचा अंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here