mumbai pune expressway toll, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेरील प्रवास महागला, चालकांना आता मोजावे लागणार इतके पैसे, वाचा सविस्तर – mumbai-pune toll tariff hike of 18% due from april 1, 2023
पुणे: पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. १ एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करताना आता अतिरिक्त टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर आता १८ टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. या अगोदर म्हणजे १ एप्रिल २०२० रोजी टोल वाढ करण्यात आली होती. दर तीन वर्षांनी टोल वाढीबाबत अधिसूचना काढण्यात येते. त्यानुसारच ही टोल वाढ करण्यात येते अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे हा प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा आणि प्रवाशांना लवकर पोहचता यावे यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र आता टोल वाढ होणार असल्याने मोठा भुर्दंड प्रवाशी नागरिकांना सहन करावा लागणार आहे. अनेकदा या महामार्गावर सुविधा नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे हा महामार्ग नेहमी चर्चेत असतो. या महामार्गावर टोल वाढ दर तीन वर्षांनी केली जाते. मात्र सुविधा मात्र पुर्ण मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येते. त्यामुळे तुम्ही टोल वाढ करा पण सुविधा देखील तशा पुरवा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनोमध्ये मृत्यू, साशाला झाला होता गंभीर आजार पुणे – मुंबई हा एक्स्प्रेस वे झाल्याने मुंबई आणि पुणे ही दोन शहरे जवळ आली. दळणवळण वाढले. मात्र या महामार्गावर वाहतूक कोंडीचा देखील मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दर शनिवार आणि रविवार महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते. हा महामार्ग झाल्यापासून यावर अपघाताची मालिका देखील तेवढीच वाढली आहे. अनेक जणांना आपले प्राण गमवावे देखील लागले आहेत.