मुंबई: भारताचा सलामीवीर विराट कोहली हा जगातील सर्वात फिट फलंदाजांपैकी एक आहे. त्याचे देशातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत; जे त्याच्या फलंदाजीसाठी वेडे आहेत. याशिवाय त्याचा फिटीन्यु आणि लूकही सर्वांना आकर्षित करतो. आयपीएल २०२३ पूर्वी, विराट कोहलीचा पत्नी अनुष्का शर्मासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. यामध्ये विराटने मद्यपान करण्याविषयी एक मोठी माहिती दिली आहे. इंडियन स्पोर्ट्स हॉनर्स या अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी अवॉर्ड शोपूर्वी एका रॅपिड-फायर राउंडमध्ये भाग घेतला. यादरम्यान या जोडप्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दोघांनी अनेक मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली. कोहलीने कबूल केले की त्याने तारुण्यात प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आणि तो एक मोठा खवय्या होता. त्याने हे देखील उघड केले की तो फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी खूप पार्टी करत असे. यादरम्यान तो ड्रिंक करून जोरदार डान्स करायचा.

६ महिने खेळला नाही तरी बुमराहला ७ कोटी कसले मिळतायंत? BCCI च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
रॅपिड-फायर राउंड दरम्यान, कोहली आणि अनुष्काला विचारण्यात आले, “डान्स फ्लोअरवर कोण जास्त रॉकिंग आहे?” ज्यावर अनुष्काने कोहलीकडे बोट दाखवलं. विराट आश्चर्यचकित झाला आणि अनुष्काकडे पाहत म्हणाला, “मी डान्स फॉलरवर जास्त धमाल करतो?” कोहलीने मग जुन्या काळातील एक गोष्ट सांगितली. तो पार्ट्यांमध्ये कशी मजा करत असे.

कोहली म्हणाला, “आता मी ड्रिंक करत नाही पण पूर्वी करायचो. पार्टीत गेल्यावर दोन ड्रिंक्स झाल्या कि, स्टेजवर डान्स आणि गाणे दोन्ही, मला लोक काय म्हणतात याचा फरक नाही पडायचा. पण आता असं काही होत नाही. या जुन्या गोष्टी आहेत.”


सध्या बंगलोरमध्ये आरसीबीने आयपीएल २०२३ ची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, रविवारी आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. आरसीबीने आयपीएलच्या १६व्या सीझनसाठी आपली जर्सी लाँच केली आहे. या कार्यक्रमादरम्यान ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

तर, आरसीबी २ एप्रिलपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध IPL 2023 मध्ये त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here