मुंबई: सध्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचे वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. येत्या ३१ मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरवंट होणार आहे. तत्पूर्वी सगळे संघ तयारीत असतानाच कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे. केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही; त्यामुळे त्याच्या जागी नितीश राणाकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. आता केकेआरमधील हाच खेळाडू बॉलिवूडमधील दमदार अभिनेता गोविंदाचा जावई आहे. केकेआरचा संघ हा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा संघ आहे. सध्या केकआर चे कर्णधार पद नितीश राणाकडे आहे आणि नितीश राणा हा गोविंदाचा जावई आहे. त्यामुळे आता शाहरूखच्या संघाला गोविंदाचा जावई यंदाचे आयपीएल जेतेपद मिळवून देतो का हे पाहायचे आहे.
‘पार्टीमध्ये दोन ड्रिंक झाल्या की…’ विराट कोहली बोलता बोलता सगळंच बोलून गेला; पाहा VIDEO
गोविंदाचा जावई

शाहरुख खानच्या टीमचा नवा कर्णधार नितीश राणा हा नात्यामध्ये अभिनेता गोविंदाचा जावई आहे. मागे एकदा द कपिल शर्मा शोमध्ये त्याने स्वतः याचा खुलासा केला होता. गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेकने कपिलच्या शोमध्ये सांगितले की, नितीशची पत्नी सांची मारवाह त्याची चुलत बहीण आहे. त्यामुळे नितीश राणा त्याचेा मेव्हणा झाला. गोविंदाची भाची सांची मारवाह हिचा नवरा असल्याने नितीश राणा त्यांचा जावई झाला.

मुंबई इंडियन्सकडून ओळख मिळाली

नितीश राणाने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१७ च्या हंगामात, मुंबईने त्याला वारंवार संधी दिली आणि नितीशने मधल्या फळीत १२ डावात ३३३ धावा केल्या. त्यात अनेक मॅचविनिंग इनिंगचाही समावेश होता. आयपीएल २०१८ च्या लिलावात केकेआरने त्याला ३.४ कोटींमध्ये विकत घेतले. २०२२ च्या लिलावात KKR ने त्याला विकत घेण्यासाठी ८ कोटी रुपये खर्च केले. आतापर्यंत आयपीएलच्या ९१ सामन्यांमध्ये राणाने २७.९६ च्या सरासरीने आणि १३४ च्या स्ट्राइक रेटने २१८१ धावा केल्या आहेत.

झाडू मारली, रिक्षा चालवली; हातात बॅट घेतली अन् गोलंदाजांची झोप उडवली

नितीश राणा यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले आहे. मात्र या रणजी मोसमातील खराब कामगिरीमुळे त्याला दिल्ली संघातून वगळण्यात आले. राणाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १२ टी-२० सामन्यांमध्ये दिल्लीचे कर्णधारपद भूषवले असून, आठ जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. केकेआर संघ १ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here