१६ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, दहा महिन्यांपूर्वी गोपीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील सचिपूर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आपली १६ वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं आणि गावातीलच लोकांनी तिचे अपहरण केले असण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान, उंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला होता.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार
आई-वडील म्हणाले ही आमचीच मुलगी
त्यानंतर बेपत्ता मुलीच्या पालकांनी मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याची ओळख पटवली. याप्रकरणी दोन मुलांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोन मुलांना अटक करून अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात त्यांची कारागृहात रवानगी केली होती.
मृत अल्पवयीन मुलगी जिवंत सापडली
यादरम्यान पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवला आणि ती मृत मुलगी नोएडा येथील एका कारखान्यात पोलिसांना सापडली. मुलगी सापडल्यानंतर तिच्या पालकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, त्यांची मुलगी नोएडामध्ये असल्याची माहिती नातेवाईकांन होती. नातेवाइकांनी जाणीवपूर्वक पुरावे लपवून दोन्ही मुलांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे.
घरच्यांना सारं माहिती होतं
या तरुणीचे लग्न झाले आहे. तिची आई मुलीवर अत्याचार करत असे, त्यानंतर ती स्वतःच्या इच्छेने नोएडाला गेली, असा आरोप आहे. पण, तिच्या पालकांनी तिला सांगितलं होतं की जर तू कधी पकडली गेली तर या दोन मुलांवर अपहरणाचा आरोप कर, असं पोलिसांनी सांगितलं.
ही मुलगी बऱ्याच दिवसांपासून तिच्या पालकांच्या संपर्कात होती. मुलीने सांगितले की, ती नोएडा येथे राहात असल्याचे तिच्या घरच्यांना माहीत होते. पुरावे लपवून मुलीच्या कुटुंबीयांनी खोट्या माहितीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यांच्याविरुद्ध कलम १८२/२११/२०१/१९४/३४४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. सध्या पोलीस आता याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.