मुंबई- रविवारी संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापिठात झालेल्या हिंसेची सर्व स्थरावर निंदा होत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सारेच या हिंसेचा विरोध करत आहेत. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हिंसेवर स्वरा भास्कर, राजकुमार राव, तापसी पन्नू, दीया मिर्जी आणि रितेश देशमुखसह इतर अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींनी कडाडून टीका केली आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

अनुराग नेहमीच सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर भाष्य करताना दिसतो. जेएनयू प्रकरणातही त्याने ट्विटरवरून आपला मुद्दा स्पष्टपणे मांडला. मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधत पोस्टमध्ये लिहिले की, ‘आता भाजप निंदा करणार. ज्यांनी केलं ते चुकीचं होतं असं ते म्हणणार, पण, सत्य हेच आहे की, जे काही झालं ते भाजप आणि अभाविपने केलं आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरून झालं. हेच एकमेव सत्य आहे.’

एवढंच नाही तर जेएनयू हिंसेविरोधात बोलताना अनुराग कश्यपने स्वतःचा प्रोफाइल फोटोही बदलला. त्याने पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा एक कार्टून फोटो लावला. या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर कपडा बांधलेला आहे आणि त्यांच्या हातात काठी आहे. फक्त अनुरागच नाही तर स्वरा भास्कर, तापसी पन्नू, राजकुमार राव, दिया मिर्झा, रितेश देशमुख, सोनम कपूर, शबाना आझमी, कोंकणा सेन शर्मा आणि ऋचा चड्ढासह अनेक सेलिब्रिटींनी या घटनेची निंदा केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण-
देशातील नावाजलेल्या विद्यापिठांमध्ये जेएनयूचा समावेश आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हे विद्यापीठ वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. रविवारी जेएनयूमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी विद्यापिठात जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मारहार केली. या मारहाणीचे आणि तोडफोडीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षा आईशी घोष गंभीर जखमी झाली.

मीडिया रिपोर्टनुसार, संध्याकाळी साधारण ६ वाजता जवळपास ५० अज्ञात व्यक्ती विद्यापिठात शिरले आणि मारहाण करायला सुरुवात केली. यात आईशीसह अन्य विद्यार्थीही जखमी झाले. असं म्हटलं जातं की, रविवारी रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता आणि अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेशी निगडीत विद्यार्थी नोंदणीसाठी तिथे गेले होते. मात्र इण्टरनेट बंद असल्यामुळे त्यांना नोंदणी करता आली नाही. यामुळेच या हिंसेमागे अभाविप असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here