धाराशीव : २०१९ मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केली, असा गौप्यस्फोट शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः मिळून १५० बैठका घेतल्या नि आमदारांचं मन वळवलं, असा दावाही तानाजी सावंत यांनी केला.जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्या लोकांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो, असंही तानाजी सावंत म्हणाले. धाराशीवमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. सावंतांनी हा दावा केला.

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात, ATS मधून बदलीचे आदेश

तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले?

“३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर, मी स्वतः – देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता” असं ते म्हणाले.

आधी एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली, मग म्हणाले संसदीय शब्द आहे हा !

“मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करुन सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही.” असं तानाजी सावंत म्हणाले.

पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या कानात हळूच विचारलं, वाचून दाखवू का? Video व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here