अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा प्रदेश कुपोषणामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील माता आणि बालमृत्यू करून कमी करत कुपोषण थांबविण्यासाठी आता जिल्हा प्रशासनासह एमबीबीएस डॉक्टरांवर मांत्रिकांची मदत घेण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आज आणि उद्या असे दोन दिवस मांत्रिकांना जिल्हा प्रशासन प्रशिक्षण देणार आहे. सोबतच रुग्ण भरती करण्यासाठी त्यांना प्रति रुग्ण १०० रुपये मानधन सुद्धा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मांत्रिक आणि आरोग्य प्रशासन खांद्याला खांदा लाऊन काम करणार

मेळघाटमध्ये मागील अनेक वर्षांपासून कुपोषणामुळे शेकडो बालक दरवर्षी दगावतात. ही कोवळी पानगळ थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, आता परिस्थितीपुढे प्रशासनाने हात टेकले असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मेळघाटाच्या गाव आणि दऱ्याखोरात नागरिकांवर उपचार करणारे मांत्रिक आता आरोग्य प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. यासाठी आरोग्य प्रशासनाच्या वतीने आज आणि उद्या असे दोन दिवस धारणी येथे या मांत्रिकांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विहिरीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह, पालक म्हणतात ही आमचीच लेक, काही काळाने मुलगी जिवंत सापडली
सर्वांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचावी

आरोग्य सुविधा मिळत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे अनेक आदिवासी जवळच असलेले मांत्रिक आणि झाडपाल्याचे औषध देणाऱ्या भुंमकाकडे जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता या भूमका आणि मांत्रिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गावात कुठलीही व्यक्ती आजारी झाली आणि तो त्यांच्यापर्यंत आला तर त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवून त्याला सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मांत्रिकांना प्रति रुग्ण शंभर रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे.

मेंढ्या विकून पोराला शिकवलं; बापाचं स्वप्न अखेर पूर्ण, मेंढपाळाचा मुलगा भारतीय सैन्य दलात भरती

जिल्हा प्रशासनाने मांत्रिकाची घेत असलेली मदत हे आरोग्य सेवेत एक महत्त्वाचा पाऊल आहे. या निर्णयाचे काही ठिकाणी कौतुक होत असले तरी मेळघाटात काम करणाऱ्या अनेक डॉक्टर हे कंत्राटी आहेत. त्यांना पुरेसा पगार नाही, राहण्याची व्यवस्था नाही आणि योग्य ते मानधनही नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर काम करत असताना जखम एकीकडे आणि उपचार दुसरीकडे अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

आपल्यासोबत मानवी वेशात वावरताहेत एलियन्स, ओळखणंही अवघड; UFO एक्सपर्टचा धक्कादायक दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here