नवी दिल्ली: जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो, तेव्हा त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या आई-वडिलांची असते. मात्र, अनेकदा हेच जन्मदाते त्याचे वैरी होतात. त्यातून अशा घटना समोर येतात, ज्या ऐकून माणुसकीवरचा विश्वास उडतो. अशीच एक घटना रशियात घडली आहे. जिथे पालकांनी स्वतःच्या बाळाचा एका प्रयोगादरम्यान जीव घेतला आहे.

मिररच्या वृत्तानुसार, एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. कारण तिने आपल्या बाळाचं खाणं-पिणं बंद केले आणि अखेर त्या बाळाचा उपासमारीने मृत्यू झाला. ३३ वर्षीय क्रूर ओक्साना मिरानोवा असे या महिलेचं नाव आहे. ही घटना वाचून तुमचे हृदय हेलावून जाईल. एका नवजात बाळासोबत कोणी असं कसं करु शकतं तेही त्याचे आई-वडील, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
तांत्रिकाचा एक सल्ला अन् शेजारीच वैरी झाला, ७ वर्षांच्या चिमुकलीला संपवलं, मग पोत्यात भरलं…
आई-वडील आपल्या मुलाला दूधही देत नव्हते

ओक्साना मिरानोव्हाने एका मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव तिने कॉसमॉस ठेवले होते. तिचा जोडीदार आणि बाळाचे वडील मॅक्सिम (वय ४३) हे लाईफस्टाईल प्रशिक्षक होते. वडिलांना आपल्या मुलाला प्राणा आहारावर ठेवायचे होते. म्हणजे एक प्रकारचा डाएट. या आहारामध्ये लोकांना दीर्घकाळ अन्न आणि पाण्याशिवाय राहावे लागते आणि ते फक्त सूर्यप्रकाश घेऊन जगतात.

त्यांनी आपल्या दोन महिन्यांच्या मुलासाठीही हाच डाएट निश्चित केला. या विचित्र प्रयोगातून त्यांना या डाएटबद्दल जगाला सांगायचे आहे, असे मुलाच्या आजीने सांगितले. त्याने बाळाच्या आईला त्याला दूध देण्यास नकार दिला. त्याला फक्त सूर्यप्रकाश घेऊन जगणाऱ्या मुलाला तयार करायचे होते.

आई वडिलांची सनक अन् बाळाने जीव गमावला

याप्रकणी मुलाची आई ओक्साना आणि वडील मॅक्सिम या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. बाळाची आई म्हणते की तिला तिच्या जोडीदाराची भीती वाटत होती. तरीही तिने अनेकदा गुपचूप बाळाला बेबी फूड दिले. या मुलाचा जन्मही घरी झाला होता. मुलाच्या आजीने पोलिसांना यासंबंधी सर्व काही सांगितले आणि असेही सांगितले की मॅक्सिम हा त्यांच्या मुलीला म्हणजेच ओक्सानाला गुलामाप्रमाणे वागवत असे. त्याने हा विक्षिप्त प्रयोग मुलावरही केला. मुलाची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला डॉक्टरकडे घेऊन जाताना वाटेतच या बाळाचा मृत्यू झाला.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here